Sangli News : सांगलीतील 400 वर्षांचा वटवृक्ष आता जिल्ह्याची 'सावली' होणार! उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची फांदी गावागावात लावली जाणार
पर्यावरणप्रेमींनी हा वटवृक्ष त्याच ठिकाणी फांद्या छाटून उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात लावली जाण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.
![Sangli News : सांगलीतील 400 वर्षांचा वटवृक्ष आता जिल्ह्याची 'सावली' होणार! उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची फांदी गावागावात लावली जाणार The 400 year old banyan tree in Sangli will now be the shadow of the district Branches will be cut and planted in villages Sangli News : सांगलीतील 400 वर्षांचा वटवृक्ष आता जिल्ह्याची 'सावली' होणार! उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची फांदी गावागावात लावली जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/d3ca7cb9abd2888266ecca51e5cab2281718165108423736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील मिरज तालुक्यातील भोसे येथील 400 वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष दोन दिवसापूर्वी पहाटे उन्मळून पडला. या जुन्या वडाच्या झाडामुळे वृक्षतोडीला चाप लावणारा कायदा अस्तित्वात आला होता. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष आता जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरणप्रेमींनी हा वटवृक्ष त्याच ठिकाणी फांद्या छाटून उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात लावली जाण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या निमित्ताने या ऐतिहासिक वटवृक्षाचे जनुकीय जपणूक होणार आहे.
महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला वटवृक्ष कोसळला
तीन वर्षांपूर्वी या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबत कायदा बदलून वृक्षतोड न करण्याचा नवा कायदा केला होता. मात्र, कायदा होऊन तीन वर्षे होण्यापूर्वी महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष कोसळला आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसेच्या यल्लमा देवीच्या दारात उभा आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाटम महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. मात्र, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि त्यांच्या वनराई संस्थेच्या सहकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण सुरू करून वृक्षतोडीला विरोध केला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून वटवृक्ष तोडू नये म्हणून
या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलायचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याची डिझाईन बदलून वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र या कामाच्या दरम्यान वृक्षाच्या मुळांना गंभीर इजा पोहोचली असावी, असे आता हा वृक्ष कोसळल्यानंतर दिसून आले आहे.
महामार्गाच्या कामासाठी आधी केलेल्या खोदाईमुळे त्याच्यामुळे इजा पोचली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेली पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने वटवृक्षाची मुळं कमकुवत झाल्याने वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला, असावा अशी ग्रामस्थांची धारणा आहे. राज्याचा कायदा बदललेल्या आणि शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीपासून या ऐतिहासिक मार्गावर असलेल्या या वटवृक्षाचे स्थान अबाधित राहण्यासाठी त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे काम आता पर्यावरण प्रेमी घेणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)