एक्स्प्लोर

Sangli News: शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू, दोन दिवसांत आढळले सहा गव्यांचे मृतदेह

शिराळा तालुक्यातील रिळे  येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Sangli News : सांगली : शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा ( Indian Bison) संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. एकाच ठिकाणी पाच गव्यांचा मृतदेह  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तरीय तपासणीमध्ये विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा  प्राथमिक अंदाज  आहे. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळले आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृत गव्यांच जागीच दहन करण्यात आले.

शिराळा तालुक्यातील रिळे  येथील पाटील दरा नामक शिवारात गेल्या दोन दिवसांमध्ये पाच गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तरीय तपासणी करून या गव्यांचे जागेवरच दहन करण्यात आले. दरम्यान, रविवारी (19 फेब्रुवारी)  पावलेवाडी खिंडीत वयोमानामुळे मृत झालेला गवा आढळला होता. दोन दिवसांत सहा गव्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभाग सर्वे नंबर 234 च्या लगत दोन नर आणि एक मादी मादी असे तीन गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागास मिळाली.  वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक हणमंत पाटील, प्रकाश पाटील, अमोल साठे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध केली असता परिसरात एकूण पाच गवे संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आले. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला. 

पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर, शुभांगी अरगडे यांनी मृत झालेल्या सर्व गव्यांची उत्तरीय तपासणी केली. त्यांनी गव्यांचा मृत्यू  झाल्याचे सांगितले.  विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. घटनास्थळी उप वनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी पाहणी केली. यावेळी रिळेचे सरपंच बाजीराव सपकाळ, पोलिस पाटील सुधीर पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तरीय तपासणीनंतर मृत जागीच दहन करण्यात आले. अधिक तपास वनक्षेत्रपाल सचिन जाधव करी

दुर्गम असलेल्या या परिसरात दोन गवे शंभर मीटर अंतरावर तर तीन गवे अडीचशे मीटर अंतरावर मृतावस्थेत पडले होते. यामुळे यांना विषबाधा करून मारण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या  भागात जेसीबीच्या साहाय्याने वाट तयार करत घटनास्थळी पोहोचावे लागले. 5 जानेवारी 2022 ला शिराळा शहरानजीक चार तसेच बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ गवे दिसले होते. यातील चार गवे तांदूळवाडीच्या दिशेने तर आठ गवे बिऊर येथील जंगल क्षेत्रात गेले होते. मृत गवे त्यापैकीच असावेत असा अंदाज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget