Sangli News : मिरजेत भाजप-जनसुराज्य महायुतीची दहीहंडी तासगावच्या शिवगर्जना गोविंद पथकाने फोडली
Sangli News: मिरजेत पहिल्यांदाच भव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी स्पर्धेत पाचहून अधिक गोविंदा पथकांनी सहभागी घेतल होता. मुंबईच्या महिला पथकानेही हजेरी लावली होती.
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार मिरजेत (Sangli News) पार पडला. भाजप-जनसुराज्य महायुतीकडून आयोजित करण्यात आलेली आणि 40 फूट उंच असणारी दहीहंडी तासगावच्या 'शिवगर्जना' पथकाने सात मनोरे रचत फोडून प्रथम क्रमांक पटकावला. या दहीहंडीसाठी 5 लाख 5 हजार 555 रुपये पाहिले बक्षीस होते. दहीहंडीच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लावणी नृत्याविष्कारावर तरुणाईने ठेका धरला होता. मिरजेत पहिल्यांदाच भव्य अशा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी स्पर्धेत पाचहून अधिक गोविंदा पथकांनी सहभागी घेतल होता. मुंबईच्या महिला पथकानेही हजेरी लावली होती.
भाजप नेते मोहन व्हनखंडे व जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला कोल्हापूरचे जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली होती. मिरज-पंढरपूर रोडवर आयोजित हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मिरज शहरासह आसपासच्या हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. अत्यंत चित्तथरारक अशा दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत तासगावच्या 'शिवगर्जना' पथकाने सात मनोरे रचत 40 फूट उंच असणारी हंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला.
कोल्हापुरातही रंगला थरार
दरम्यान, कोल्हापुरातील दसरा चौकात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या वातावरणात दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायाम मंडळाच्या गोविंदांनी यशस्वी सात थर लावत धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी फोडून गुरुवारी बाजी मारली होती. 'नेताजी'ने आत्मविश्वासपूर्वक चढाई करत 38 फुटांवरील ही हंडी फोडून 3 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार धनंजय महाडिक, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याहस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात आले. तर हंडी फोडणारा गोविंदा प्रकाश मोरे यांनी 51 हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. युवाशक्तीच्या दहीहंडीचे यंदा दहावे वर्ष होते. हंडी फुटल्यानंतर मैदानावर मैं हूं डॉन गाण्यावर अवघे मैदान डोलू लागले. नेताजी गोविंदांनी धनंजय महाडिक यांना उचलून घेतले आणि महाडिकांनी या गाण्यावर ठेका धरला.
इतर महत्वाच्या बातम्या