Chandrahar Patil: 'माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद...', एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांच्या भेटीनंतर चंद्रहार पाटील यांचं स्पष्टीकरण
Chandrahar Patil: डबल महाराष्ट्र केसरी, पैलवान चंद्रहार पाटील यांनी कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चा रंगल्या.

सांगली : शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कुडाळमध्ये काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्याचबरोबर चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्यां पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला होता. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरेंचा पैलवान पक्षाला रामराम ठोकणार अशी चर्चा होती. याच चंद्रहार पाटलांसाठी सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला होता. पण आता हेच पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा होती, त्यावर आता चंद्रहार पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रहार पाटील?
चंद्रहार पाटलांच्या भेटीनंतर आणि भोजनानंतर ते ठाकरे गट सोडणार अशा चर्चा होत्या त्यावरती त्यांनी सोशल मिडियावरती पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2005 साली पासून, म्हणजेच जवळपपास 20 वर्षापूर्वी पासूनचे माझे मित्र व राज्याचे उद्योग मंत्री मा.उदय सामंत साहेब यांनी मला स्नेह भोजणाचे आमंत्रण दिले, भोजन करून 15 ते 20 मिनिटात मी बाहेर पडलो. या वेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली, परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की.परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की".
परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की.@abpmajhatv@TV9Marathi.@saamTVnews#chandraharpatil #news #udaysamant #shivsena #maharastra #sangli pic.twitter.com/CUbuHQxgsI
— डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@Chandrharpatil) April 25, 2025
पुढे त्यांनी केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय, राजकीय डावपेचापेक्षा, ज्या क्रीडा क्षेत्राने मला ओळख मिळवून दिली ते माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काही गैर वाटत नाही. याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही. तर याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
......... तर याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही.
— डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@Chandrharpatil) April 26, 2025
.
.#chandraharpatil #news #udaysamant #shivsena #maharastra #sangli pic.twitter.com/jrr4tfJgms
नेमकं काय घडलं?
चंद्रहार पाटील हे पैलवान आहेत. सध्या ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राज्य संघटक या पदावर आहेत. चंद्रहार पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. गुरुवारी (24 एप्रिल) रात्री उशिरा ही भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं बोललं जातंय. या भेटीवर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्यावेळी माझी आणि उदय सामंत याची भेट झाली, असं चंद्रहार पाटलांनी सांगितलं आहे. या गाठीभेटी आणि स्नेहभोजनानंतर चंद्रहार पाटील ठाकरेंना सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.























