(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli: सांगलीतील विलिंग्डन कॉलेजच्या सिक्युरिटी गार्ड्सकडून विद्यार्थ्यांना पाठलाग करुन बेदम मारहाण, गुन्हा दाखल
Sangli Crime: मारहाण होताना काही विद्यार्थी त्या ठिकाणाहून पळून गेले तरी त्यांना त्यांच्या घरी जाऊन गार्ड्सनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
सांगली: शहरातील विलिंग्डन कॉलेजमध्ये सिक्युरिटी गार्डकडून (Sangli Willingdon College Security Guards) विनाकारण विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कॉलेजमध्ये मारहाण केल्यानंतर सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरात जाऊन पुन्हा विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. यात विद्यार्थी जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार सिक्युरिटी गार्ड्सवर संजयनगर आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli Willingdon College Security Guards: सांगलीतील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Sangli Willingdon College Viral Video) झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांना ही बेदम मारहाण कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकले नाही.
सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमधील बीसीएसच्या दुसऱ्या वर्गाची परीक्षा झाल्यावर विद्यार्थी घरी जात असताना तिथल्या गाड्यांजवळ सेल्फी काढत होते. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना सिक्युरिटी गार्ड्सनी काठीने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना विद्यार्थी घाबरून घराकडे पळू लागले. तर सिक्युरिटी गार्ड्सनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पुन्हा त्यांना जबर मारहाण केली.
दोन ठिकाणी गुन्हा दाखल
या प्रकरणी संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये चार सिक्युरिटी गार्ड्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलिंग्डन कॉलेजमध्ये अथर्व कदम या विद्यार्थ्याला सिक्युरिटी गार्डने जबर मारहाण केली. सिक्युरिटी गार्डने पियुश दीपक जाधव आणि प्रणित या अठरा वर्षे वयाच्या मुलांना त्यांच्या घराजवळ जाऊन जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत विलिंग्डन कॉलेजच्या सूरज सूर्यवंशी आणि अन्य दोन सेक्युरिटी गार्ड्सविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांना पाठलाग करून अमानुष मारहाण करणे, शिव्या देणे, धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे संजय नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे काही विद्यार्थ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीने पालक वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहेत. विलिंग्डन महाविद्यालयाने या प्रकरणाचा तपास करुन संबंधित सिक्युरिटी गार्ड्सवर कारवाई करावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून केली जात आहे.
ही बातमी वाचा: