एक फडणवीस आणि त्यांच्या जोडीला दोन रामोशी; रघुनाथदादा पाटलांची एकनाथ शिंदे, अजित पवारांवर सडकून टीका
पाटील यांनी एक फडणवीस आणि त्यांच्या जोडीला दोन रामोशी अशीच स्थिती असल्याचे सांगत खरे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दोन रामोशींच्या माध्यमातून कारभार सुरु असल्याचा टोला लगावला.
Sangli News : शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकरी आणि कामगारांच्या एकीसाठी मेळावा आयोजित करून दत्ता सामंत आणि जाॅर्ज फर्नांडिस यांना बोलावले होते. यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये लेख लिहिताना एक जोशी आणि दोन रामोशी अशी टीका केली होती. याच टीकेचा दाखला देत बीआरएस पक्षाचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडले आहे. पाटील यांनी एक फडणवीस आणि त्यांच्या जोडीला दोन रामोशी अशीच स्थिती असल्याचे सांगत खरे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दोन रामोशींच्या माध्यमातून कारभार सुरु असल्याचा टोला लगावला.
काय म्हणाले रघुनाथदादा पाटील?
पाटील बोलताना म्हणाले की, राजकारणाची स्थिती भयानक आहे, कोणाचा पायपोस कोणाला नाही अशीच एकंदरीत स्थिती आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणासोबत चालला आहे याचा काही संबंध राहिलेला नाही. काही झालं तरी सत्ता सोडायची नाही, असा सगळा प्रकार सुरु आहे. शरद जोशी यांनी शेतकरी आणि कामगार एकत्र व्हावेत म्हणून एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यासाठी दत्ता सामंत आणि जाॅर्ज फर्नांडिस यांना निमंत्रित केले होते. नेमका हाच धागा पकडून बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमधून लेख लिहिताना एक जोशी आणि दोन रामोशी अशी टीका केली होती. आज एक फडणवीस आणि त्यांच्या जोडीला हे दोन रामोशी गेले आहेत. आपलं काहीचं भलं यांच्याकडून होत नाही. कॅबिनेट बैठकीमध्ये पाणीपट्टी वाढवण्यात आली नाही. अशा वाईट अवस्थेत आपण आहोत. स्वातंत्र्य मिळालं आहे, पण हे स्वातंत्र्य आपलं गळा घोटणारं ठरत आहे. स्वातंत्र्य अमृतमहोत्सव साजरा केला जात नसून शेतकऱ्यांचा मृतमहोत्सव साजरा केला जात आहे.
पहिल्यांदा बोलले नंतर स्पष्टीकरण
पाटील यांनी आपलं वक्तव्य जातीयवादी नसल्याचे नंतर बोलताना सांगितले. ते म्हणाले की, शेतकरी पुत्र म्हणून जे काही पुण्या मुंबईमध्ये विशेषत: कामगार चळवळीत काम करतात, जे कामगार आहेत त्या शेतकऱ्यांना कामगारांसोबत शरद जोशींनी त्यांना सोबत घेऊन एक कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी लेख लिहिला की एक जोशी आणि दोन रामोशी. त्यांचा सांगण्याचा अर्थ असा होता की, जोशी काही म्हणत असले तरी हे लोक काही त्यांना करू देणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये जे काही देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेलं आहे ते खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, त्यांचीच सत्ता आहे. त्यांनीच या लोकांना खेळवलं आहे, असं माझ्या बोलण्याचा अर्थ आहे. फडणवीस यांच्याकडून करून घेतात, त्याचा अर्थ जातीवादी नाही. पूर्वीच्या काळात असं म्हणत होती की पाटील आदेश देणार आणि रामोशाच्या काठीन कारभार करणार तर अशा अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या