एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... वीजेचा धक्का लागून 3 जणांचा मृत्यू; वडिलांना शोधण्यास गेलेल्या लेकाचाही अंत

म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज ये-जा करत असतात.

सांगली : जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या म्हैसाळ (Sangli) येथे विजेचा शाँक लागून तीन जणांचा मुत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. एकाच गावातील तीन युवकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे. प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय (35),पारसनाथ वनमोरे वय (40),शाहीराज पारसनाथ वनमोरे वय (12)  अशी मृतांची  नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (वय 15)हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला असून ग्रामस्थांनी महावितरणविरुद्ध (MSEB) संताप व्यक्त केला आहे.     

म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज ये-जा करत असतात. आज सकाळी शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. त्यावेळी वीजेची वायर तुटून शेतात पडली होती. मात्र, शेतातून चालत असताना त्यांच्या लक्षात न आल्याने पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मुत्यू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा वडिल पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराजलाही वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये, त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  

दरम्यान,  शेतातून प्रदिप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील शॉक लागून त्यांचा मुत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत हेमंत वनमोरे हा तरुण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे  पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर, पंचनामा करुन सर्व मुतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली वनमोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे, या दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा

शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Akshy shinde funeral: अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : राज्यातील 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP MajhaSolapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडीAkshay Shinde Encounter : एन्काऊंटर संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Akshy shinde funeral: अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Embed widget