(Source: Poll of Polls)
Sangli Crime: सोलापुरातील सराईत दुचाकी चोरट्यांना सांगलीत बेड्या, 17 दुचाकीसह सात लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangli Police: आष्टा, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, पुसेगाव आणि फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. या तिघांनी सांगली जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात दुचाकी चोरल्या होत्या.
सांगली पोलिस: सांगलीमध्ये आष्टा पोलिसांनी दुचाकींची चोरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील तिघा सराईतांना अटक करत त्याच्याकडून तब्बल 17 दुचाकीसह सात लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नामदेव बबन चुनाडे, महादेव भोसले, गणेश भोसले अशी आरोपींची नावे असून हे सर्व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या तिघांनी सांगली जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात दुचाकी चोरल्या होत्या.
तिघांना बेड्या ठोकण्यात आल्याने आष्टा, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, पुसेगाव आणि फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टामधील अप्पर तहसील कार्यालयाजवळ संजय भानुसे यांची दुचाकी चोरीला गेल्यानंतर फिर्याद दिली होती. आष्टा पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या.
आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील सांगली इस्लामपूर रस्त्यालगत एका दुचाकीवरून संशयित संशयितस्पदरित्या वावरत होता. त्याची खात्री करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून गुन्हे उघडकीस आले. गेल्या काही दिवसात आष्टासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन आष्टा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले आहे.
टेलिग्राम ग्रुपमधून ऑनलाईन फसवणूक
ऑनलाईन ट्रेडिंगनंतर फायद्याचे आमिष दाखवून बनावट बँक खात्याच्या माध्यमातून फसवण्याचा प्रकार सांगली पोलिसांनी (Sangli Police) उघडकीस आणला आहे. या माध्यमातून गंडा घालण्यासाठी बनावट खात्यावर जमा झालेली 7 कोटी 81 लाखाची रक्कम गोठवण्यात आली आहे. इस्लामपूरमधील हर्षवर्धन पाटील यांनी 21 लाख 10 हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. संशयितांनी कॅपिटलिक्स ऑनलाईन टेलीग्राम ग्रुपवरुन संवाद साधून अधिक फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. यासाठी बँक खाते नंबर देण्यात आला. परताव्यासाठी करापोटी आणखी पैसे जमा करण्यासाठी वेगवेगळे खाते नंबर चॅटिंगद्वारे देण्यात आले.
फिर्याद दाखल झाल्यानंतर सांगली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास करून फसवणूक केलेल्या कंपनीच्या 27 वेगवेगळ्या बँक खाते आणि त्यातील सात कोटी 81 लाख गोठवल्याची माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. सोशल मीडियावरून होणाऱ्या ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे ज्यादा पैसे मिळवण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीपासून सावधान राहण्याचा आवाहन करत कॅपिटलएक्स टेलीग्राम ग्रुप व इतर टेलिग्रामवरून अशा प्रकारची जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सांगली सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक तेली यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या