एक्स्प्लोर

Sangli News: 'हे सरकार जाहिरातीचे सरकार', भाजपला धडा शिकवण्याचा संकल्प; सांगलीत महानिर्धार मेळाव्यात काँग्रेस नेत्यांचा एल्गार

Siddaramaiah in Maharashtra : सांगलीत सीएम सिद्धरामय्या यांचा नागरी सत्कार तसेच महानिर्धार मेळावाही पार पडला. या मेळाव्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली. 

Sangli News : नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka  Assembly Elections) काँग्रेसने दमदार यश मिळवताना भाजपचा दारुण पराभव केला. या विजयानंतर शंभर हत्तींचे बळ मिळालेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून सांगलीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याकडून करण्यात आलं. सिद्धरामय्या यांचा नागरी सत्कार तसेच काँग्रेस महानिर्धार मेळावाही पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. 

कर्नाटकचे यशस्वी सूत्र आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवू

आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये विजय निश्चित असल्याचे विश्वास यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे असाही दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की, कर्नाटकचे यशस्वी सूत्र आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवू आणि हे भाजपचे शेतकरीविरोधी सत्कार उलथवून टाकू. सिद्धरामय्या यांची पार पडणारी सभा ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची नांदी आहे, महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय निश्चित आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. 

भाजपला धडा शिकवणुकीचा संकल्प

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, आदिपुरुष चित्रपटाच्या माध्यमातून बजरंग बलीचा अपमान करण्याचे पाप भाजपकडून करण्यात आले. आता त्यांच्यासोबत बजरंग बली सुद्धा नाही आणि श्रीराम देखील नाही. राज्यातील असंवैधानिक सरकारने वारकऱ्यांवर लाठीचार्जच करायला लावला. पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पांडुरंगाचा अपमान करण्याचं काम केलं आहे. हे सरकारी जाहिराती सरकार असून जाहिरात करून पंढरपूरमध्ये तापमान महाराष्ट्र आणि देवाचा अपमान केला आहे अशी टीका त्यांनी केली. पांडुरंगाचा अपमान सहन करून केला जाणार नाही. भाजपला धडा शिकवणुकीचा संकल्प काँग्रेसने केला आहे.

भाजप सरकारकडून लोकशाहीची गळचेपी सुरू

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही महाराष्ट्रत येणारे सरकार आपलंच राहणार असल्याची खात्री दिली. राज्यातील सरकारकडून फक्त घोषणा सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र, काम कोणतेही केलं जात नाही. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. फक्त जाहिरातींवर खर्च सुरू आहेत. केवळ जाहिरातीतून खोटा प्रचार सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून राज्यघटनेचे काय होणार? याची भीती वाटते. भाजप सरकारकडून लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याची टीका थोरात यांनी केली. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात अन्यायाची भावना होऊ नये, असे आवाहनही सिद्धरामय्या यांना बाळासाहेब थोरात यांनी केले. विश्वजीत कदम यांनीही आपल्या भाषणात बोलताना मराठी भाषिकांना न्याय देण्याचे आवाहन केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कोकणात जोरदार हजेरी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
सिंधुदुर्ग, सातारा, पुणेसह तब्बल 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कोकणात जोरदार हजेरी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
Sangli : फुल दिले की फुलच मिळते, दगड दिला की दगडच मिळतो, कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही : जॅकी श्रॉफ
फुल दिले की फुलच मिळते, दगड दिला की दगडच मिळतो, कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही : जॅकी श्रॉफ
Sangli Satara : सांगली- साताऱ्यात तिरंगी सामना, सेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे, भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट सामना
सांगली- साताऱ्यात तिरंगी सामना, सेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे, भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट सामना

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget