प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचितांसाठी की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
धनदांडग्या नेत्यांची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) एका तासात निर्णय बदलला असे म्हणत प्रकाश शेंडगेंनी (Prakash shendge) आंबेडकरांवर जोरदार टीका केली.
Prakash shendge on Prakash Ambedkar : धनदांडग्या नेत्यांची भेट झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) एका तासात निर्णय बदलला असे म्हणत प्रकाश शेंडगेंनी (Prakash shendge) आंबेडकरांवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांची आज मिरजमध्ये (Miraj) जाहीर सभा होत आहे. यावरुन शेडगेंनी आंबेडकरांवर टीका केली.
वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी?
ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगेंनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका केली. वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले. तसेच धनदांडगे प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांना भेटले आणि एका तासात काय घडलं की त्यांनी विशाल पाटलांना आणि सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला, असा सवाल शेंडगेंनी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा विचार करावा
ओबीसी, बहुजन, मागासवर्गीय या सर्वांनी मिळुन सुरु केलेली चळवळ एकत्रित चालवली तर चालू शकेल अन्यथा धनदांडगे चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी पुनश्च एकदा विचार करुन आपला निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन देखील प्रकाश शेंडगेंनी केले आहे. तर आनंदराज आबेडकर यांनी प्रकाश शेंडगे याना सांगली लोकसभेसाठी पाठिंबा दिल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या सर्वत्र चर्चा
सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील पुन्हा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळं विशाल पाटील हे नाराज आहे. ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळं विशाल पाटील यांनी बंड करत उमेदवारी दाखल केली. विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला आहे. आता सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत होत आहे. तिन्ही उमेदवार तुल्यबळ समजले जातायेत. त्यामुळं कोण बाजी मारणार हे येत्या 4 जूनलाच समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sangli Lok Sabha: सांगली लोकसभेत मिरज पॅटर्नची तुफान चर्चा; पक्षीय पाश झुगारुन सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटलांचा प्रचार