एक्स्प्लोर

Sangli Lok Sabha: सांगली लोकसभेत मिरज पॅटर्नची तुफान चर्चा; पक्षीय पाश झुगारुन सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटलांचा प्रचार

Maharashtra Politics: सांगली लोकसभेत चंद्रहार पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशाल पाटील यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चंद्रहार पाटील यांना बूथलाही माणसं मिळत नसल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

सांगली: लोकसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असणाऱ्या सांगली मतदारसंघात मतदान जसजसे जवळ येत आहे, तसतसे एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सांगलीच्या (Sangli Lok Sabha) राजकारणात सध्या अस्तित्त्वात आलेल्या मिरज पॅटर्नची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यासाठी सांगलीतील सर्वपक्षीय नगरसेवक एकटवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नगरसेवकांनी विशाल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. हे पाऊल उचलताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षीय पाश झुगारुन टाकले आहेत. 

भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या या मिरज पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक असणारे नगरसेवकही या पॅटर्नमध्ये सहभागी झाले आहेत. भाजप पक्षाच्याही अनेक नगरसेवकांनी ही संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत. पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याची ठाम भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आता भाजप, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, ही जागा काँग्रेसची असल्याचे सांगत विशाल पाटील यांनी याठिकाणी शड्डू ठोकला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी मनधरणी करुनही विशाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माघार घेतली नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता सांगलीत विशाल पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये विशाल पाटील यांना मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे. 

कोणत्या नगरसेवकांचा विशाल पाटलांना पाठिंबा?

* मैन्युदीन बागवान- राष्ट्रवादी, शरद पवार गट, माजी महापौर

* अझम काझी- राष्ट्रवादी

* चंद्रकांत हुळवान- राष्ट्रवादी

* नरगीस सय्यद- राष्ट्रवादी

* शिवाजी दुर्वे- भाजप

* आनंदा देवमाने- भाजपा

* निरंजन औटी- भाजप

* संदीप औटी- भाजप

* संजय मेंढे- काँग्रेस

* बबीता मेंढे- काँग्रेस

* करन जामदार- काँग्रेस

* वहिदा नायकवाडी- काँग्रेस

आणखी वाचा

शरद पवारांची राष्ट्रवादी समुद्रात बुडणारं जहाज, बिचाऱ्या चंद्रहारला बुथसाठी माणसं मिळेनात- गोपीचंद पडळकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Embed widget