Sangli News : नागपंचमीसाठी सांगलीतील शिराळा नगरी सज्ज; कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं पोलिसांकडून आवाहन
Sangli News : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या शिराळ्यामधील नागपंचमीसाठी प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येणार आहे.
सांगली : जगप्रसिद्ध असलेल्या नागपंचमी (Nagpanchami) सणासाठी शिराळानगरी सज्ज झाली आहे. तसेच, सोमवार (21 ऑगस्ट) रोजी होणाऱ्या सणाच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणादेखील कार्यरत झाली आहे. या नापंचमीला जिवंत सर्पाची (Snake) हाताळणी होऊ नये यासाठी वनविभागकडून देखील गस्त घालण्यात येणार आहे. वन विभागाकडून शिराळ्यासह इस्लामपूर आणि वाळवा परिसरात 12 पथकं तैनात करण्यात आली आहेत. सांगलीतील शिराळ्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशानंतर ही प्रथा बंद करण्यात आली आहे. त्यानंतर शिराळकरांनी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यास सुरुवात केली.
तालुक्यामध्ये जनजागृतीचे कार्य
सर्प हाताळनीचे कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन होऊ नये यासाठी वन विभाग आणि प्राणीमित्र प्रयत्नशील आहेत. तसेच, यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गाव पातळीवर पथनाट्य, शाळांमध्ये चित्र प्रदर्शन, व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. तसेच या जनजागृतीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आलेला आहे. नागपंचमीच्या दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत रहावीआणि गर्दीमध्ये वाहनांमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
शिराळामधील नागपंचमीचा उत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यासाठी मोठ्या संख्येने शिराळ्यातील नागपंचमीच्या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिराळ्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी वाहनांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे नियमित रस्त्यावर वाहतूकीचा ताण पडून रहदारीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होऊ देण्यासाठी पोलिसांकडून वाहतूकीचं नियोजन करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर डॉ. बसवराज तेली यांनी पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात गस्ट रोजीसाठी बदल केल्याचे आदेश जारी केले आहेत.
शिराळ्यामधील नागपंचमी उत्सवाचा इतिहास
हजारो वर्षांपासून शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा केली जात होती. असं म्हटलं जातं की, शिराळामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भीक्षा मागण्यास आले होते. त्यावेळी त्यांना भिक्षा देण्यासाठी वेळ झाला. म्हणून गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला? असा सवाल महाजनांना विचारला. तेव्हा आपण नागाची पूजा करत होतो असं महाजनांच्या पत्नीने गोरक्षकनाथांना सांगितलं. गोरक्षकनाथांनी त्या महिलेला जिवंत नागाची पूजा कर असं म्हटलं. तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाला. शिराळ्याच्या प्रत्येक घरामध्ये जिवंत नागाची पूजा केली जात होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानंतर ही प्रथा खंडित झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Kavad Yatra : श्रावणानिमित्त शिवसेनेची भव्य कावड यात्रा, कुर्ल्यात हजारो भाविकांची हजेरी