Sangli Central jail : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील संशयिताने ठोकली धूम
सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील एका आरोपीने पलायन केलं आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैरण अड्डा येथील भिंतीवरून आरोपी उडी मारून पसार झाला.
![Sangli Central jail : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील संशयिताने ठोकली धूम Murder suspect escapes from Sangli District Central Jail Sangli Central jail : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील संशयिताने ठोकली धूम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/31/b623637ac7e5b840297c0352d07597181659254966_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangli Central jail : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील एका आरोपीने पलायन केलं आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैरण अड्डा येथील भिंतीवरून आरोपी उडी मारून पसार झाला. सुनील राठोड असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुनील राठोड आणि त्याच्या पत्नीला तासगावमधील एका खून प्रकरणी अटक करण्यात आली होती. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अनवेशनचे एक पथक कर्नाटकाकडे रवाना झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली-तासगाव येथे जेसीबी चालकाचा खून करणारा संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. येळगोड ता. सिंदगी जि. विजापूर) हा आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास जिल्हा कारागृहातून पळाला. त्याबाबत कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलीस ठाण्यात तो पळून गेल्याची तक्रार दिली आहे.
सुनील हा जेसीबी मालक हरी येडुपल पाटील (रा. मंगसुळी) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. मालक हरी पाटील यांनी सुनीलची पत्नी पार्वतीच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे चिडून जावून सुनील आणि त्याच्या पत्नीने 8 जून 2021 रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घृण खून करून हा मृतदेह विहिरीत टाकला होता.
या प्रकरणांचा तपास तत्कालिन स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने करून सुनील आणि त्याची पत्नी पार्वतीला अटक केली होती. सुनील हा सांगली कारागृहात जेरबंद आहे. रविवारी सकाळी त्याने कारागृहातून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी पोलीसांच्याकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक कर्नाटकाकडे देखील रवाना झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)