एक्स्प्लोर

Weather update : कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; पुढील 48 तास अंत्यत महत्त्वाचे, IMD कडून धोक्याची घंटा

Sangli Flood : कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सातत्याने धरणातून नदी पात्रात विसर्ग वाढवला जात आहे.

सांगली :  राज्यातील विविध भागात पावसाचा जोर (Heavy Rain) कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान,  कोल्हापुरात आज  आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी, रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला. त्यामिळे सांगलीसाठी (Sangli Rain)  पुढील 48 तास महत्त्वाचे असणार आहे.  त्यामुळे नदीकाठच्य गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

 कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्याच्या पाणी पातळीत वाढ आहे. कृष्णा-वारणा  नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर येथे नद्या पात्राबाहेर पडल्य आहेत. दुसरीकडे कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सातत्याने धरणातून नदी पात्रात विसर्ग वाढवला जात आहे. त्यामुळे  सांगली  जिल्ह्यासाठी पुढील 48  तास अतिशय  महत्त्वाचे आहेत. सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट आहे. कोयनेतून दुपारी दहा हजार क्युसेक्सचा विसर्ग वाढविल्याने व पावसाच्या इशाऱ्याने सांगलीत पाणी पातळी शनिवारी 41 ते 42  फूट जावू शकते. 

सांगलीसाठी पुढील 48 तास का महत्त्वाचे?

हवामान खात्याने कोल्हापुरात आज  व सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी, रविवारी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे सांगलीच्या पुराबाबत पुढील 48  तास महत्वाचे असणार आहेत. जर कोयना धरण क्षेत्रात पाऊस मुसळधार झाला तर धरणातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि यामुळेच चाळीस फुटावर असलेली कृष्णा नदीची पातळी धोकादायक पातळीकडे जाऊ शकते.  यामुळेच पुढील काही दिवस सांगली साठी महत्त्वाचे असणार आहेत.

 महापालिका प्रशासनाकडून खबरदारी

सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.  सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे.  महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहे.

पुढील 3 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे.  4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.   

हे ही वाचा :

सावधान! कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget