एक्स्प्लोर

सावधान! कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज  

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कुठं रेड, तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर (Heavy Rain) कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कुठं रेड, तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कोल्हापूरला रेड अलर्ट, तर कोकणसह पुणे साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं कोल्हापुरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

पुढील 3 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे.  4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 

या 14 जिल्ह्यात पडणार अति जोरदार पाऊस 

माणिकराव खुळे यांना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईशहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली  आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडलातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनं प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोणत्या जिल्ह्यात किती पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget