लसीकरणानंतरही लम्पीचं टेन्शन; सांगलीत पाचशेहून अधिक जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव, पशूवैद्यकीय विभागासमोर आव्हान
Maharashtra Sangli News : लसीकरण करूनही सांगलीत पाचशेहून अधिक जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव. पशूवैद्यकीय विभागासमोर मोठं आव्हान
Maharashtra Sangli News : राज्यात (Maharashtra News) जनावरांमध्ये असलेल्या लम्पी आजाराचं संकट काही ठिकाणी लसीकरणानंतरही कायम आहे. सांगली जिल्ह्यात (Sangli District) गेल्या आठवड्यात लसीकरण करूनही 532 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. एकीकडे परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे जनावरांमधल्या लम्पी आजाराचं संकट आहे. ऊस हंगाम सुरु झाल्यानं आता अन्य जिल्ह्यातूनही जनावरे ऊसपट्ट्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे लम्पीचा (Lumpy Disease) धोका आणखी वाढेल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
राज्यात लसीकरणानंतरही लम्पीचा संसर्ग वाढला (Lumpy Skin Disease) आहे. अस्मानी संकटापाठोपाठ लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावानं शेतकरी दुहेरी संकटाच्या विळख्यात अडकला आहे. तर परिस्थिती उद्धवली तर जनावरांना लम्पीचा दुसरा डोसही देण्याच्या तयारीत सरकार आहे.
मागील महिन्यापासून राज्यासह देशभरात लम्पीचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक लसीचा डोस देऊनही लम्पीचा प्रादुर्भाव काही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे एकीकडे परतीच्या पावसानं शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं पशुधनही लम्पी आजाराच्या वाढत्या संकटामुळे धोक्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात तर मागील आठवड्याभरात लसीकरण करून देखील 532 जनावरांना बाधा झाली आहे. तर दुसरीकडे आता ऊस हंगाम सुरू झाल्यानं अन्य जिल्ह्यांतून जनावरे ऊस पट्ट्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे लम्पिचा धोका आणखीनच वाढताना दिसत आहे.
राज्यात गोवर्गीय जनावरांचे शंभर टक्के लसीकरण होऊनही लम्पीचा संसर्ग वाढताना दिसत असल्याचं चित्र आहे. या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होताच प्रशासनानं राज्यभरातील जनावरांचा आठवडे बाजार बंद केला. तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली. आता तर अनेक जिल्ह्यात ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून आपल्या जनावरांसह टोळ्या येऊ लागल्यानं शेतकऱ्यांसमोर आणखी चिंता वाढली आहे. यातील काही जनावरांचे लसीकरण झालं आहे. मात्र ज्या जनावरांचे लसीकरण झालेलं नाही ती जनावरं धोकादायक ठरू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nanded: नांदेड जिल्ह्यात 93 पैकी 83 मंडळात अतिवृष्टी; सरासरीच्या 133 टक्के पाऊस