एक्स्प्लोर

Sangli News: सावधान! महाराष्ट्रातील पॅन नंबरचं दिल्ली कनेक्शन, साडे तीन कोटींचा जीएसटी घोटाळा

Sangli News: सांगली जिल्हयात यापूर्वी विजयनगर, सांगली येथे गुजरात मधील व्यापाऱ्याने खोबरं विक्री दाखवून विभगास चार कोटींचा चुना लावला होता.

Sangli Crime : सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन प्रकाराचा अवलंब करतात. जीएसटी विभाग शेकडो कोटींचे घोटाळे उघडकीस आणत असतानाच आणखी नवनवीन फंडे वापरुन घोटाळेबाज यंत्रणेला कामाला लावत आहेत. आर्थिक वर्ष संपत असताना सांगलीतील एका व्यक्तीला आयकर विभागाकडून आलेल्या नोटीसमध्ये त्याने दिल्ली येथे 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या दरम्यान सुमारे 18 कोटींचा व्यवसाय केला असल्याचे नमूद केले होते. ही नोटीस पाहून संबंधित व्यकी चक्रावली, कारण असे कोणतीही विक्री त्याने कधी केली नाही. त्याने त्या संदर्भात अधिक चौकशी केली असता दिल्ली येथे त्याचा PAN क्रमांक वापरुन घोटाळेबाज व्यक्तीने 18 कोटींचा व्यवसाय दाखवून सुमारे 3.5 कोटींच्या जीएसटीची चुकवेगिरी केली आहे.

सांगली जिल्ह्यात यापूर्वी विजयनगर येथे गुजरातमधील व्यापाऱ्याने खोबरं विक्री दाखवून विभगाला चार कोटी रुपयांचा चुना लावला होता. तसेच दुसऱ्या एका प्रकारात जतमध्येही एका शेतमजुराच्या आधार, पॅनचा वापर करुन कोट्यवधींची बोगस विक्री दाखवत जीएसटी चोरी केली होती. याचे पुढे काय झाले हे समजलं नाही. यामुळे आता प्रत्येक पॅन नंबर करदात्याने आपल्या नंबर चा गैरवापर होत नाही ना हे महिन्या-दोन महिन्याच्या अंतराने नियमितपणे पाहिले पाहिजे.

यासाठी करदात्याने gst.gov.in या संकेस्थळावर टॅक्स पेअरसर्च मध्ये पॅन टाकला असता त्याला संलग्न जीएसटी क्रमांक समजतो. तसेच फसवणुकीसंदर्भात cbic-gst.gov.in येथे तक्रार करता येते. सध्या सर्वसामान्य करदात्यांना जीएसटी नंबरसाठी आधारसह अनेक स्तरीय पडताळणी करणे आवश्यक असून ही अशा गोष्टी वारंवार समोर येत आहेत ही आश्चर्याची बाब आहे. 

बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक

बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. एका टोळीने अनेक अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप 'वन कार्ड'कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे GST क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती हॅकर्सना मिळाली होती. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे PAN डिटेल्स काढले आणि त्याद्वारे त्यांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड जारी करत फसवणूक केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget