एक्स्प्लोर

Sangli News: सांगलीत प्रांताधिकार्‍याने केलेल्या अतिक्रमणाने दाम्पत्यावर मरण्याची वेळ; पतीची इच्छामरणाची मागणी, पत्नीकडून महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न

Sangli News: सांगली शहरातील मिळकतीच्या जागेवर प्रांताधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत सुनील पाटील दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

Sangli News: सांगलीमधील एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छा मरणाची परवानगीची मागणी केली आहे, तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील त्यांच्या मिळकतीच्या जागेवर प्रांताधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत सुनील पाटील दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

प्रांताधिकाऱ्याकडून जागेत अतिक्रमण 

सांगली शहरातील दक्षिण शिवाजीनगरमधील जुन्या माळी चित्र मंदिराच्या मागील बाजू सुनील पाटील यांनी 2006 मध्ये दोन गुंठे जागा खरेदी केली, त्याची रीतसर नोंद देखील केली. त्यांच्याकडे असणाऱ्या उपलब्ध कागदपत्रांनुसार त्यांच्या आणि जुन्या मालकांमध्ये 2 हजार 100 स्क्वेअर फुट जागेची खरेदी झाली. यानंतर पाटील यांच्या असणाऱ्या भूखंडावर पूर्वेच्या बाजूने सुमारे 300 स्क्वेअर फूट अतिक्रमण झाले आहे. त्यांच्या जागेत शेजारील गजानन गुरव यांनी हे अतिक्रमण केल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. गजानन गुरव हे पंढरपूर या ठिकाणी सध्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

आपल्या पदाचा गैर गैरवापर करत हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप पाटील दाम्पत्याने केला आहे. याबाबत पाटील यांनी अगदी जागेशी संबंधित असणाऱ्या विविध विभागांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. याप्रकरणी सुनील पाटील यांनी जागेचे मूळ मालक माळी यांच्या समवेत गुरव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. गुरव यांनी आपल्या जागेवर आता बांधकाम केलं आहे. याला महापालिकेकडून बांधकामाची परवानगी देखील मिळाली आहे. त्यामुळे पाटील कुटुंब पुन्हा या आपल्या जागेच्या मिळकतीवरून आक्रमक झाले आहे.

न्याय मिळत नसल्याने इच्छामरण द्यावे

गुरव अधिकारी असल्याने पदाचा गैरवापर करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने पाटील दाम्पत्य हतबल झाले असून त्यांनी आता शेवटचा मार्ग म्हणून मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. सुनील पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे इच्छा मरण अर्ज दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याने इच्छा मरण द्यावे, अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला महापालिकेकडे तक्रार दाखल करून देखील गुरव यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे. 

पत्नीकडून आत्मदहनाचा प्रयत्न

आपल्या पतीला इच्छा मरण मागण्याची वेळ आली असल्याने, पाटील यांच्या पत्नी सारिका पाटील यांनी थेट महापालिकेच्या कार्यालयात जाऊन महापौरांच्या दालनामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे महापौर यांनी या प्रकरणाचा दुजोरा देत गुरुव यांनी अतिक्रमण केले आहे, तसेच भूमापनकडे आम्ही कागद पाठवले आहेत. कागद पाहून योग्य तो निर्णय आयुक्त साहेब घेतील. मात्र, सिटी सर्व्हे आणि सात बारा या दोन्हींमध्ये नावे वेगवेगळे असल्यामुळे हा घोळ झाल्याचा समोर आलं आहे. मात्र, पाटील कुटुंब त्रस्त झाले आहे. त्यांना न्याय मिळवून नक्कीच महापालिका देईल, असा विश्वास महापौरांनी दिला. 

वादावर प्रांताधिकारी काय म्हणाले?

जागेच्या अतिक्रमणाबाबत पंढरपूर प्रांताधिकारी गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे सर्व प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने आपण याबाबत काही बोलू शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. एकूणच या सर्व प्रकरणात पाटील दाम्पत्याने न्याय मिळत नसल्याने थेट आता मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालावं आणि संबंधित प्रांताधिकाऱ्यांवर  कारवाई करावी,अशी मागणी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Sangli ST Bus Accident : सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती 
सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, दोन ते तीन जणांचा मृत्यू, 15 ते 16 जण जखमी
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget