(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli mass suicide : सावकारी कर्जानेच म्हैसाळमधील एकाच कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या, पोलिसांच्या तपासात निष्पन्न
Sangli mass suicide : कुटुंबियांना वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी तसेच अपमान करुन तसेच चौकामध्ये अडवून कुटुंबीयांचा, शारिरीक मानसिक छळ करून त्रास दिल्याने सामूहिक आत्महत्या केली आहे
Sangli mass suicide : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी सांगली पोलिसांनी तडीपार केलेल्या सावकार धुमाळ पिता पुत्राचा समावेश आहे.
कुटुंबियांना वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी तसेच अपमान करुन तसेच चौकामध्ये अडवून कुटुंबीयांचा, शारिरीक मानसिक छळ करून त्रास दिल्याने सामूहिक आत्महत्या केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांपैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. 12 जणांच्या शोधासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये पोलिसांची पथके रवाना केली आहेत. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपींना दुपारच्या सुमारास सांगली कोर्टात उभे करण्यात येणार आहे.
आरोपींमध्ये सावकारी करणाऱ्या अनेकांवर या आधी गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात असे सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मयत दोघा भावांच्या खिश्यात दोन चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यांनी व्यापारासाठी सावकारी कर्ज घेतल्याचे चिट्ठीमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखले केलेले आरोपी म्हैसाळ गावामधील आहेत.
- रेखा तात्यासो चौगुले
- तात्यासो आण्णाप्पा चौगुले
- आशु शैलेश धुमाळ
- शेलैश रामचंद्र धुमाळ
- खंडेराव केदारराव शिंदे
- राजु लक्ष्मण बन्ने
- अनाजी कोंडीबा खरात
- अनिल लक्ष्मण बन्ने
- शामगोंडा कमगोंडा पाटील
- शिवाजी कोरे
- नंदकुमार रामचंद्र पवार
- सतिश सखाराम शिंदे
- शिवाजी नामदेव खोत
- गणेश ज्ञानु बामणे
- शुभद्रा मनोहर कांबळे
- प्रकाश पवार
- विजय विष्णु सुतार
- नंदकुमार रामचंद्र धुमाळ
- राजेश गणपती होटकर
- पांडुरंग श्रीपती घोरपडे
- आण्णासो तातोबा पाटील
- नरेंद्र हणमंतराव शिंदे
- अनिल बाबु बोराडे
- संजय इराप्पा बागडी
- महादेव वसंत सपकाळ
इतर महत्त्वाच्या बातम्या