Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंचा सांगलीत डबल बार! लोकसभेला 'मशाल' पेटवण्यासाठी चंद्रहार पाटील 500 गाड्यांसह मातोश्रीवर
पैलवान चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून त्यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याची शक्यता आहे.
![Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंचा सांगलीत डबल बार! लोकसभेला 'मशाल' पेटवण्यासाठी चंद्रहार पाटील 500 गाड्यांसह मातोश्रीवर Chandrahar Patil leaves with a fleet of 500 cars to enter Shiv Sena Thackeray faction indicate of Sangli Lok Sabha contest Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंचा सांगलीत डबल बार! लोकसभेला 'मशाल' पेटवण्यासाठी चंद्रहार पाटील 500 गाड्यांसह मातोश्रीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/cef31575adfea0d8c79c0ab4326d53df1710146619310736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील (Sangli Loksabha) महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा कायम आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात शिवसेना उध्दव ठाकरे गटाला सांगलीची जागा (Sangli Loksabha) देण्याच्या हालचाली गतिमान होताना दिसत आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडे जाण्याची शक्यता आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.
चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार
पैलवान चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून त्यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याची शक्यता आहे. तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी रवाना झाले आहेत. आज दुपारी तीन वाजता चंद्रावर पाटील मातोश्रीवर जाणार आहेत.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रावर पाटील यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश होताच उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रावर पाटील सांगली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेकडून चंद्रहार यांच्या उमेदवारीची घोषणा झाली तर सांगली जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार आहे.
विशाल पाटील यांची भाजप खासदार संजयकाकांवर सडकून टीका
दुसरीकडे, सांगली लोकसभेसाठी तिकिटासाठी एकीकडे चढाओढ असतांना काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जर काँग्रेस कडून तिकीट नाही भेटले, तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे असे विशाल पाटील यांनी म्हणत भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत स्पष्टीकरण दिले. पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाचा भूमिपूजन समारंभ सोहळ्यात विशाल पाटील बोलत होते.
आपल्याला हिंदी बोलणारा जर चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्ष्या गल्लीत बसतो आणि दररोज तासगाव-सांगली करतो. राजा-राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन घेऊन नारळ फोडतो अशी टीका विशाल पाटील यांनी संजयकावर केली.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आज जोमाने काम करत आहे. तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष आहे, याचा आनंद आहे. पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडत आहेत. काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडला. त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली आहे. त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्रची नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असेही विशाल पाटील म्हणाले. आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मात्र आता आमची भागली आहे. आता आम्ही ज्या विमानात मी बसायचा निर्णय घेतला त्या विमानाचे विश्वजित पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे म्हणत विशाल पाटील यांनी अपत्यक्षपणे अन्य पक्षात जाणार नाही असे संकेत दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)