एक्स्प्लोर

Crime News: लैंगिक अत्याचार झालेल्या अल्पवयीन पीडितेवर 3 अज्ञातांकडून हल्ला; कटरच्या सहाय्याने वार अन्...

Crime News: सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले आहेत. या पिडित कुटूबांला सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

सांगली: आटपाडीमध्ये काही दिवसांपूर्वी एका जीम चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. यातील आरोपी सध्या जेलमध्ये असतानाच या अल्पवयीन मुलीवर काल(शनिवारी) रात्री 3 अज्ञाताकडून कटरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. मात्र मुलीच्या अंगावरील कपडे या हल्ल्यात फाटले आहेत. काल रात्री अंगणात मुलगी भांडी घासत असताना मुलीवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याची मुलींच्या कुटूंबाची तक्रार आहे.

घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर पोलिसांना सापडले आहे.आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत हल्ल्यात वापरलेला कटर  ताब्यात घेतल आहे. मात्र पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला ? व कशासाठी केला याचा अद्याप तपास लागला नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

आटपाडी तालुक्यात मागील गेल्या काही दिवसांपूर्वी एका जिम चालक व खाजगी परिचारिकेने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती गाडीत बसवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याबाबत आरोपी जिम चालक संग्राम देशमुख व परिचारिका सुमित्र लेंगरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मात्र, काल (शनिवारी) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पीडिता घराच्या बाहेर भांडी धुऊन उभारली असताना तीन अनोळखी युवकांनी तिच्यावर कटरने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने पीडितेला कोणतीही जखम झाली नाही. 

यावेळी पीडितेने बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. मात्र अंगावरील कपडे फाटले आहेत. घटनास्थळी पीडितेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले कटर सापडले आहे. दरम्यान या घटनेनंतर पीडित कुटुंब पूर्णपणे भयभीत झाले असून सध्या कुटुंब प्रंचड घाबरले आहे. आरोपी संग्राम देशमुख व सुमित्रा लेंगरे यांच्या अटकेनंतर आटपाडी शहरामध्ये सर्वसमाजाने मोर्चा काढत नराधम संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता. 

नराधम संग्राम देशमुख यांचे अनेक गैरकृत्य समोर येण्याची शक्यता आटपाडी तालुक्यामध्ये व्यक्त होत आहे. तर पीडितेवर हल्ला नेमका कोणी केला? व कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता मुलीसह तिच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची नागरिकांची मागणी आहे, मुलीवर पुन्हा हल्ला होण्याची किंवा तिच्या कुंटूबावर हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Fake Medicine : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठाRahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जAbu Azami On MVA : हिंदुत्ववाद्यांसोबत सपा राहणार नाही, अबू आझमी ठामTop 25 : टॉप 25 न्यूज : 6  PM : 7 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Embed widget