(Source: Poll of Polls)
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवरही ठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.
सांगली : सांगली जिल्ह्यातील(Sangli Crime) आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर एका जिमचालक तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवरही ठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला मदत करणाऱ्या महिलेला अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींने मुलीवरील अत्याचार केलेल्या कृत्याचे चित्रीकरण केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असेही पोलीस तपासात समोर आले आहे. संग्राम देशमुखहा आटपाडी मध्ये जिम चालवत होता. आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे.
आटपाडीमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हा अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी आज आटपाडी शहर बंद करत आटपाडी बसस्थानकापासून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवावी, सरकारी वकील या केसमध्ये द्यावा अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली. आटपाडीमधील अल्पवयीन मुलीवर गेल्या काही दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला.
आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी
आरोपीला या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आटपाडीकर जनता आक्रमक झाली असून, आरोपी संग्राम देशमुख या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी व त्याच्या महिला साथीदाराची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आटपाडी शहर आज बंद ठेवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीने पीडित मुलीच्या कुटूंबाला कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळावे. आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी. त्याच्याशी हितसंबंध असणाऱ्यांचा शोध घेऊन चौकशी व्हावी. या गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांनाही शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या