Sangli Loksabha : सांगलीत पहिल्या चार तासात 16 टक्के मतदान; अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा
सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत.
सांगली : सांगली लोकसभसेसाठी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 16 टक्क्यांच्या आसपास मतदान झालं आहे. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून येत आहेत. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत.
हातकणंगलेत पहिल्या दोन तासात हातकणंगले, शिरोळमध्ये चुरस; इस्लामपूर, शिराळ्यात काय स्थिती? #hatkanangle #Maharashtra #MaharashtraPolitics https://t.co/nMBd2CvMRr
— ABP माझा (@abpmajhatv) May 7, 2024
लोकसभेत महाविकास आघाडीच्या येणाऱ्या जागा विधानसभेची नांदी : रोहित पाटील
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, तसेच महाराष्ट्रात विधानसभेला मविआ सरकार येणार असल्याची नांदी असेल, असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात पहिल्या दोन तासात कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर मतदारसंघात मतदानात चुरस! #Kolhapur #Maharashtra #LokSabhaElection2024 https://t.co/YikBRMBQDi
— ABP माझा (@abpmajhatv) May 7, 2024
राष्ट्रवादी, शिवसेना फोडाफोडीचा रोष या राज्यात नक्कीच लोकांमध्ये आहे ते या लोकसभा निवडणुकीत दिसेल. बारामतीमधून सुप्रिया सुळेच विजय होतील, असा देखील विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला. तासगाव तालुक्यातील अंजनी या आपल्या गावी रोहित पाटलांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी ते बोलत होते.
Kolhapur Loksabha : मतदान करायला लागतंय! कोल्हापुरात सकाळपासूनच सर्वदूर मतदानासाठी रांगाच रांगा #Kolhapur https://t.co/FinXWNvh6W
— ABP माझा (@abpmajhatv) May 7, 2024
इतर महत्वाच्या बातम्या