एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Buldhana: गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान; शेगाव नगरी सजली

Buldhana: संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

Gajanan Maharaj Palkhi Sohala: बुलढाणा जिल्ह्यातील शेगावनगरीत  (Shegaon)  उत्साहाचे टाळ वाजतायत आणि मृदुंगातून सात्विकता पाझरू लागली हे. बच्चा कंपनीपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच राम कृष्ण हरी या मंत्राने भुरळ घातली आहे. कारण आहे गजानन महाराजांच्या पालखी प्रस्थानाचं. आज संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान होणार आहे. यासाठी संस्थानातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या विठोबाच्या लेकी, डोक्यावर शुभ्र टोपी, हाती वैष्णवाची पताका, गळ्यात टाळ, कपाळी अबीर आणि चंदनाचा टिळा लावलेले ज्ञानोबा-तुकोबांचे पाईक आणि मुखी विठ्ठलाचे नाम... असं सगळं विठ्ठलमय वातावरण ठायी ठायी दिसणार आहे. सर्व वारकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.

आजपासून गजानन महाराजांची (Gajanan Maharaj) पालखी पंढरपूरच्या दिशेने मजल-दरमजल करत पुढे पुढे सरकत राहणार आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं यंदा 54 वं वर्ष आहे. सुमारे 30 दिवसांत, तब्बल साडेपाचशे किलोमीटरची वाट तुडवत विठ्ठलभक्त गजानन महाराजांच्या सोबतीने पंढरपूरकडे (Pandharpur) निघणार आहेत. 27 जून रोजी ही पालखी पंढरपुरात पोहोचेल आणि आषाढीला गजानन महाराज विठ्ठलाची गळाभेट घेतील.

शेगावातून प्रस्थान ठेवणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखी मार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. पालखी मार्गावर दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी होते, हे लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. गर्दी अधिक वाढली तर गरज पडल्यास पालखीच्या मार्गाबाबत पोलीस प्रशासन निर्णय घेऊ शकते.

आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून (Maharashtra) 43 पालख्या पंढरपुरात (Pandhapur) दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.

ज्ञानोबांची पालखी 11 जूनला ठेवणार प्रस्थान

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत अनेक दिंड्या घेऊन दाखल होतात. श्रींची पालखी 12 जूनला गांधी वाड्यात दाखल होणार आहे आणि त्यानंतर ज्ञानोबांची पालखी मार्गस्थ होणार आहे.

तुकोबांची पालखी 10 जूनला ठेवणार प्रस्थान

संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर, 28 जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. यंदा तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.

हेही वाचा:

New Parliament : होम-हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि मोदींचे भाषण... असं आहे नवीन संसदेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे टाईमटेबल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget