Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर, 'हे' मतदारसंघ असतील राखीव
Ratnagiri ZP Reservation : रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं असून ओबीसीसाठी 16 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत.
रत्नागिरी: जिल्हापरिषदेच्या एकूण 62 जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात 31 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (OBC) 27 टक्क्यांप्रमाणे 16 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण आणि जिल्हा परिषद गट याची माहिती खालीलप्रमाणे,
1) सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे मतदारसंघ- 22
2) सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीचे मतदारसंघ- 20
3) OBC प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ- 8
4) OBC प्रवर्ग महिला सर्वसाधारण 8
5 ) अनुसूचित जाती- 2
6 ) अनुसूचित जाती महिला- 1
7 ) अनुसूचित जमाती महिला- 1
असं आहे आरक्षण?
सर्वसाधारण : गोळप, कनकाडी, दाभोळे, भांबेड, साठवली, केळवली, कशेळी, जुवाटी, जालगाव, दयाळ, शिरळ, पेढे, शिरगांव, सावर्डे, खेर्डी, उमरोली, वहाळ, निवळी, कोकरे, असगोली, कुवारबाव.
महिला सर्वसाधारण : लोटे, धामणदेवी, वेळणेश्वर, नाचणे, धमापूर तर्फे संगमेश्वर, कोसूंब, तळवडे, केळशी, अलोरे, वाटद, दाभोळ, ताम्हाणे, शुंगारतळी, पालगड, उसगाव, पडवे, कोतवडे, पावस, साडवली, विरांचीवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) : इस्लामपूर, बाणकोट, भरणे, कसबा, करबुडे, झाडगाव, कोंडकारुळ, कातळी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : भिंगळोली, कडवई, खालगाव, हातखंबा, खेडशी, साखरीनाटे, धामपुरतर्फे संगमेश्वर, माभळे, टेटवली.
अनुसूचित जाती : भडगाव, गव्हाणे.
अनुसूचित जाती महिला : आसगे.
अनुसुचित जमाती महिला : सुकिवली.