(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Refinery Survey Protest Live Updates : पोलिसी बळाचा वापर करुन सर्वेक्षण करु नका : अजित पवार
Refinery Survey Protest Live Updates : बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पाविरोधातील (Refinery survey) आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत.
LIVE
Background
Ratnagiri Refinery Survey Protest Live Updates : बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पाविरोधातील (Refinery survey) आंदोलनाबद्दल मोठी बातमी आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्यासोबत अन्य दोन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तिघांनाही सध्या रत्नागिरीत ठेवण्यात आलं आहे.
कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे.. दरम्यान काल काही नागरिकांना घरी पाठवण्यात आलं मात्र ज्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे, ती जागा मात्र आंदोकांनी सोडली नाही. काहींना घरी पाठवल्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने आंदोलनस्थळी रात्रभर पहारा दिला,
काल राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
कोकणातले सर्वपक्षीय राजकारणी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलनापासून लांब
कोकणात रिफायनरी विरोधात स्थानिकांनी भूमिका घेतलेली असताना कोकणातले सर्वपक्षीय राजकारणी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनापासून लांब आहेत. कोकणातल्या रिफायनरीचा नाणार ते बारसू - सोलगाव हा प्रवास पाहिल्यास सुरुवातीला स्थानिकांच्या सोबतीन किंवा स्थानिकांचा आवाज तो आमचा आवाज म्हणत रिफायनरी विरोधातल्या आंदोलनात उतरलेले सर्वपक्षीय राजकारणी यापासून दूर आहे. प्रकल्पाचे समर्थन किंवा विरोध या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मुख्य बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी वेळ पडल्यास कोकणात येण्याचा इशारा दिला आहे. पण ज्यांच्या मतदार संघात, ज्यांच्या भागात हे रिफायनरी विरोधातले आंदोलन केलं जात आहे. त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र यापासून दूर आहेत.
उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आद (25 एप्रिल) कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणार आहे. सध्या पोलीस बळाच्या होत असलेल्या वापरावर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहे. दुपारी ही पत्रकार परिषद असणार आहे. तसेच उद्धव ठाकरे हे राज्यपालांची देखील भेट घेणार आहेत
पोलिसी बळाचा वापर करुन दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करु नका ; तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा : अजित पवार
Ajit Pawar : बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला केली आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा, विनायक राऊतांची माहिती
Refinery Survey : बारसु येथे सकाळपासून सुरु असलेल्या परिस्थितीचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेण्यात आला असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे. ठाकरे गट स्थानिकांसोबत असल्याचं याआगोदरच ठाकरे गटाने स्पष्ट केल आहे. खासदार विनायक राऊत आज मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे याबाबत लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे
रिफायनरीविरोधातील आंदोलनाचा उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा, विनायक राऊतांची माहिती
Refinery Survey : बारसु येथे सकाळपासून सुरु असलेल्या परिस्थितीचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेण्यात आला असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे. ठाकरे गट स्थानिकांसोबत असल्याचं याआगोदरच ठाकरे गटाने स्पष्ट केल आहे. खासदार विनायक राऊत आज मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे याबाबत लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे
रिफायनरी प्रकल्पाचा सर्वांना फायदा, शेतकऱ्यांना नुकसान होणार याची सरकार काळजी घेणार : दीपक केसरकर
Refinery Survey : कोकणातील शेतकऱ्यांवर सरकारचा अन्याय, सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा : अशोक वालम
Refinery Survey : आज कोकणात रिफायनरीसाठी राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव येथे बळजबरीने गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सर्वसाधारण जनतेवर अन्यायाने अत्याचार करत आहेत. त्यांचा निषेध करत सर्व राजकीय पक्ष तसेच महाराष्ट्रातील सर्व सुज्ञ जनता यांनी या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे मी सर्वांना आवाहन बळी राज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केलं.