Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Ratnagiri Rains: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे. आज दिवसभर जोर कायम राहील अशीच एकंदरीत शक्यता सध्याचं वातावरण पाहता दिसून येत आहे.
Ratnagiri Rain Updates : रत्नागिरी : राज्यातील (Maharashtra Rain Updates) अनेक भागांत मुसळधार पाऊस (Rain Latest Updates) कोसळत आहे. पावसाच्या जोरदार सरींनी अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai Rains), ठाणे, नवी मुंबई, कल्णाय परिसरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी सकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. यासोबतच कोकणातही जोरदार पाऊस पडत असून आज दिवसभरात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. कोकणातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे. आज दिवसभर जोर कायम राहील अशीच एकंदरीत शक्यता सध्याचं वातावरण पाहता दिसून येत आहे. रविवारी दिवसभर पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलं. त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे. असं असलं तरी आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. एकंदरीत पावसाचं वातावरण पाहता आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
रविवारी रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं पुरतं झोडपून काढलं. सोशल मीडियावर मुसळधार पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच, सोमवार पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याचं दिसत आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागांत आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काही गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर या भागातील जामदा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली आहे. नदीचं पात्र विस्तीर्ण असून दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य पुलाला हे पाणी लागल्याचं पाहायला मिळालं. तसेच, खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून नदीकिनारीच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी रात्रीपासून रत्नागिरीत पावसाची कोसळधार पाहायला मिळते. रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी तीन नद्या धोका पातळीच्या वरून वाहत आहेत. तर तीन नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. दरम्यान, चिपळूणमधील वाशिष्टी नदीची पाणी पातळी मात्र धोका किंवा इशारा पातळीच्या वरती नसल्याची माहिती मिळत होती.
पाहा व्हिडीओ : Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प