एक्स्प्लोर

Ratnagiri News : हिंदुस्तान कोका-कोलाच्या नवीन ग्रीनफील्ड कारखाना रत्नागिरीत उभारणार, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Eknath Shinde : एमआयडीसी लोटे परशुमार औद्योगिक क्षेत्रातील 88 एकर जागेत सुमारे 1,387 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून कारखाना उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

रत्नागिरी :  भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक हिंदुस्तान कोका-कोला (Coca-Cola) बेव्हरेजेसने रत्नागिरीतील (Ratnagiri) एमआयडीसी लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आगामी ग्रीनफील्ड कारखान्यासाठी भूमिपूजन समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) उपस्थित होते. एचसीसीबीचे सीईओ जुआन पाबलो रॉड्रिग्ज यांच्यासह कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. दरम्यान या कारखान्याचे काम फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे  एचसीसीबीच्या उत्पादन क्षमतांमध्ये मोठी वाढही होणार आहे. त्याचप्रमाणे शाश्वत विकासाप्रती कंपनीही बांधिलकीही या कारखान्यामुळे अधिक दृढ होण्यात मदत होईल. 

या कारखान्यामुळे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यास मदत होईल. 1,387 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून या कारखान्याची निर्मीती करण्यात येणार आहे. दरम्यान 88 एकरात हा कारखाना उभारला जाईल. हा कारखाना जवळपास 350 व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असेही अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील समृद्ध परिसरात स्थापन केला जाणारा हा कारखाना वसिष्ठी नदीतील पाण्याचा वापर करेल. एमआयडीसी पाइपलाइनद्वारे कारखान्याला हे पाणी पुरवले जाईल. 

अनेक सामुदायिक उपक्रम राबवणार

एचसीसीबी महाराष्ट्रात अनेक समुदाय उपक्रमही राबवणार असल्याची माहिती देण्यात आलीये. शैक्षणिक पायाभूत सुविधा, पाण्याचे एटीएम्स, शाश्वत शेती आणि समुदाय संवाद केंद्र यांसारख्या उपक्रमांमुळे अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होण्यास मदत होईल. तसेच लोटे भागातील 10,000 जणांना या उपक्रमांचा थेट लाभ होणार आहे. एचसीसीबी 14 गावांतील 3000 स्त्रियांना डिजिटल आणिआर्थिक कौशल्यांनी सुसज्ज करणार आहे. तसेच 2,500तरुणांना विक्री आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देणार आहे. 

महाराष्ट्राला शाश्वत करण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ - मुख्यमंत्री शिंदे

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'हा केवळ औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा नाही, तर औद्योगिक वाढ आणि सामाजिक कल्याण यांतील समन्वयात्मक संबंध जोपासण्याप्रती महाराष्ट्र सरकारची बांधिलकी यातून दिसून येते.आपण आपला औद्योगिक व सामाजिक विकासाचा अजेंडा सातत्याने पुढे नेत राहणार असल्यामुळे एचसीसीबीसारख्या कंपन्या निभावत असलेल्या भूमिकेचे मोल महाराष्ट्र सरकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शाश्वत व न्याय्य वाढीचा दीपस्तंभ करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ मिळत आहे.'

एक प्रगतशील राज्य उभारण्याचे आमचे उद्दिष्ट - उदय सामंत

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी म्हटलं की, आमच्या प्रशासनातील महाराष्ट्राचे उद्दिष्ट एक प्रगतीशील आणिस्थितीस्थापक राज्य उभारणे हे आहे. केवळ आर्थिकदृष्ट्या वाढणारे नव्हे तर समाजाच्या कल्याणाची खात्री करणारे राज्य होण्याची आमची इच्छा आहे. आमची धोरणे ही दुहेरी बळातून घडवली जातात. यातील एक म्हणजे आर्थिक वाढीला उत्तेजन देणे तर दुसरे म्हणजे आमच्या समुदायांची सामाजिक वीण सुरक्षित राखणे होय. एचसीसीबीचा विस्तार या उद्दिष्टाशी तंतोतंत मिळताजुळता आहे, ही बाब सुखद आहे.

एचसीसीबीचे सीईओ जुआन पाबलो रॉड्रिग्ज म्हणाले, 'हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसच्या प्रवासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे महाराष्ट्राच्या सुपीक जमिनीत पेरलेली वाढ, शाश्वतता व समुदाय सहयोगाची बिजे तर आहेतच, शिवाय राज्यातील अनुकूल व्यावसायिक वातावरणाचेही हे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील संभाव्यतेबाबत आम्हाला वाटणारा विश्वास आणि त्याप्रती आम्ही सातत्याने दाखवलेली बांधिलकी या आगामी कारखान्याद्वारे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर आमच्या गेल्या दोन दशकातील सामाईक इतिहासाचे प्रतिबिंबही त्यात उमटले आहे.'

हेही वाचा : 

Eknath Shinde : जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलंच पाहिजे : मुख्यमंत्री शिंदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget