रत्नागिरीचो हापूस मुंबईक इलो! यंदाच्या हंगामातली पहिली हापूस पेटी मुंबईला रवाना, एका पेटीला मिळाला एवढा भाव
दापोली तालूक्यातून हर्णेमधून मुंबई मार्केटमध्ये पाठवण्यासाठी या हंगामातील आंब्याची जानेवारी महिन्यातच पहिली पेटी दाखल झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोलीतील पहिली हापूस आंब्याची (Alphanso Mango) पेटी मुंबई मार्केटमध्ये रवाना झाली. गेली कित्येक वर्षे हा मान हर्णेच्या मयेकर कुटुंबाकडेच येत आहे. आंबा हे फळ सगळ्याचं आवडत फळ. आंबा पाहिला की सर्वानाच मोह अनावर होतो. आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याला एप्रिल महिना उजाडतो. परंतु दापोली तालूक्यातून हर्णेमधून मुंबई मार्केटमध्ये पाठवण्यासाठी या हंगामातील आंब्याची जानेवारी महिन्यातच पहिली पेटी दाखल झाली आहे.
फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते.लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. अशातच यंदाच्या हंगामातील हर्णेमधील आंबा बागायतदार सागर मयेकर यांच्याकडून दोन डझनची एक पेटी असा तीन पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. पहिल्या मानाच्या दोन डझन आंब्याच्या पेटीची किंमत 7700 रुपये इतकी झाली. म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास 321 रुपये एवढी झाली आहे. अश्या तिन्ही पेट्यांची एकूण 23112 रुपये अशी किंमत मुंबई मार्केटमध्ये मिळाली. पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. दापोलीतील आंबा विक्री व्यवसायाला साधारण दोन महिने अगोदरच मुहूर्त लागला आहे.
कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी
हंगामातील पहिला आंबा काढल्यानंतर सागर मयेकर यांनी आंब्याच्या तीनही पेट्या देवघरात ठेऊन विधीवत पूजा केली आणि नंतरच त्या पेट्या मार्केटमध्ये पाठवल्या. कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूसची निर्यात होत असते. महिन्याभरापूर्वी पुण्यात देवगड आब्यांची पहिली पेटी विकली गेली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी हापूस विकला गेला. दापोली तालुक्यातील हर्णेमधील हापूस आंबा मुंबई मार्केट मध्ये विकला गेला. त्यामुळे आंबा पिकाला पुढे हंगामात चांगलं पीक येऊन सुगीचे दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु
यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून मार्च किंवा महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरु होईल.
हे ही वाचा :