Ratnagiri: दाभोळ खाडीत दिसून आली जीवदीप्ती
Ratnagiri: दाभोळ खाडीत दिसून आली जीवदीप्ती, कोकणातल्या खाडीत पहिल्यांदाच निरीक्षण,पर्यटनप्रेमी.. सत्यवान देर्देकर यांनी केले निरीक्षण
Ratnagiri Latest Marathi news Update : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जिवदीप्तीचे निरीक्षण प्रथमच कोकणातील दाभोळ खाडीत केले आहे. परचुरी येथील पर्यटन व्यवसायिक व पर्यटन प्रेमी सत्यवान देर्देकर यांनी हे निरीक्षण केले आहे. गुहागर तालुक्यातील परचुरी येथे सत्यवान देर्देकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय करतात दाभोळ खाडीत केल्या जाणाऱ्या मगर सफरसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. यासाठी विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात.
सेलिब्रिटीदेखील अनेक वेळा येथील पर्यटनाचा आनंद घेतला आहे. गोव्याच्या समुद्रामध्ये जिवदीप्तीचे निरीक्षण केले जाते. कोकणात अशी जिवदीप्ती अनेक वेळा दिसून येते मात्र तिचे निरीक्षण होत नाही. जीवदीप्तिमान सजीवांच्या पेशीत ल्युसिफेरीन वर्गातील रसायने आणि ल्युसिफरेज (विकर) ही रसायने तयार होतात. ल्युसिफेरीनचा ऑक्सिजनाशी संयोग घडून आल्यामुळे प्रकाशनिर्मिती होते. या क्रियेत ल्युसिफरेज विकर उत्प्रेरकाची भूमिका बजावते. काही वेळा कॅल्शियमची आयने किंवा एटीपीचे रेणू या क्रियेत भाग घेतात.वेगवेगळ्या सजीवांमध्ये आढळणारे ल्युसिफेरिन वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर पडणारा प्रकाश वेगवेगळ्या तरंगलांबीचा, निळसर ते लाल असतो.हा प्रकाश ‘शीत’ प्रकारचा असतो. या अभिक्रियेत मुक्त झालेली 80 टक्के ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते तर उर्वरित सु. 20 टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते.
फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम जातीच्या जीवाणूंच्या वृद्धीमिश्रणातून उत्सर्जित झालेला प्रकाश काही मीटर दूर असलेली वस्तू झळाळून टाकते. अनेक सागरी प्राणी जसे आंतरदेहगुही, कृमी, मृदुकाय, कंटकचर्मी मासे आणि जीवाणूंमध्ये सहजीवन आढळून येते.हे जीवाणू जीवदीप्तीकारक असतात. जीवदीप्तीचा वापर हे जीव वेगवेगळ्या प्रकारे करून घेतात.उदा.काजव्याचा नर आणि मादी प्रजननासाठी एकत्र येण्यापूर्वी प्रकाश प्रक्षेपित करतात. सागरी वलयी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि प्रकाशमान होते.हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावर येऊन मादीबरोबर प्रणय करतो. नंतर दोघेही पाण्यात प्रजननपेशी सोडतात.काही जीवदीप्तीमान खेकडे मीलनासाठी जोडीदार शोधण्यासाठी जीवदीप्तिचा वापर करतात.
मी पर्यटकांना दाभोळ खाडीत मगर सफरीचा आस्वाद देतो. दाभोळ खाडीत अशाप्रकारचे जीवदीप्ती अनेक वेळा दिसून येते मात्र मच्छिमार यांनी त्याचे कधी निरीक्षण केले नसावे.आमच्या नवीन बोटीचे काम सुरू असताना आर्किटेक्ट रोहन मेंगले यांना परचुरी बंदरावरून ही जीवदीप्ती दिसून आली. त्यावेळी त्यांनी मला याची माहिती दिल्यावर मी व माझ्या कुटुंबियांनी या जीवदीप्तीचे निरीक्षण केले, असे परचुरी येथील पर्यटन व्यवसायक सत्यवान देर्देकर यांनी सांगितलं.