एक्स्प्लोर

Ratnagiri News : नेहमीप्रमाणे बँकेतून निघाली पण घरी परतलीच नाही; तीन दिवस बेपत्ता असलेल्या चिपळूणमधील तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडला

Ratnagiri News : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत पाण्यावर तरंगताना सापडला. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील ओमळी गावात ही घटना घडली.

Ratnagiri News : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणीचा मृतदेह दाभोळ खाडीत (Dabhol Creek) पाण्यावर तरंगताना सापडला. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण (Chiplun) तालुक्यातील ओमळी गावात ही घटना घडली. आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. निलीमा सुधाकर चव्हाण असं मृत तरुणीचं नाव आहे.

कामावरुन परत येण्यासाठी निघाली, पण घरी पोहोचलीच नाही

निलीमा सुधाकर चव्हाण ही महिला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली (Dapoli) शाखेत काम करत होती. मागील महिन्यात 29 जुलै रोजी ती नेहमीप्रमाणे बँकेतून ओमळी गावातील घरी परत येण्यास निघाली. परंतु या प्रवासादरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली. तीन दिवस घरी ती परतली नसल्याने पोलीस तक्रार करण्यात आली होती. मात्र चार दिवसांनंतर तिचा मृतदेह दाभोळच्या खाडीत पाण्यावर तरंगताना आढळला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिचे केस कापण्यात आले होते. शिवाय तिच्या भुवया देखील काढल्या होत्या. अतिशय वाईट अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता.  

खेडमधील एसटी स्टँडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निलीमा दिसली होती. चिपळूणला जाणाऱ्या एसटीमध्ये बसताना दिसली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. ती कोणत्या स्टँडवर उतरली हे समजू शकलेलं नाही. शिवाय तिचा मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन 29 जुलैच्या रात्री 12.05 वाजता अंजनी रेल्वे स्टेशन दाखवत आहे. 

पोलिसांकडून म्हणावं तसं सहकार्य मिळालं नाही, नातेवाईकांचा आरोप

दरम्यान दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करुनही खेड आणि दापोली पोलीस ठाण्याकडून पाहिजे, तसे सहकार्य मिळाले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत घडलेल्या घटनेचा तपास पोलीस लावत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी काल घेतली होती. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. चिपळूणमध्ये काल जिल्ह्यातील मृत महिलेच्या समाज बांधवांनी आणि विविध सर्वपक्षीय नागरिकांनी चिपळूण पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि पोलिसांकडे लवकरात लवकर तपास करुन आरोपीला तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही मागणी केली.

...तर 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसू

निलीमा चव्हाणची हत्या नेमकी का झाली याचं कारण समजू शकलेलं नाही. पोलीस तपासातूनच ही बाब समोर येईल. मात्र कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नाभिक समाजाने केली आहे. तसंच 12 ऑगस्टपर्यंत या घटनेचा तपास होऊन आरोपीला अटक न झाल्यास 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा

Ratnagiri Accident : दापोलीत भीषण अपघात, वडाप गाडी-ट्रेलरची जोरदार धडक, आठ जणांचा मृत्यू, सात जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget