Jaigad Fort : जयगड किल्ल्याच्या बुरुजाच्या बातमीची पुरातत्व विभागाकडून दखल; 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट, जेएसडब्लू कंपनीला दणका!
Ratnagiri News : जेएसडब्लू कंपनीला दणका मिळाला आहे. जयगड किल्ल्याच्या बुरुजाच्या बातमीची पुरातत्व विभागाकडून दखल घेण्यात आली आहे.
Jaigad Fort :रत्नागिरीमधील (Ratnagiri) जयगड किल्ल्याच्या (Jaigad Killa) बुरुजाच्या दुरावस्था झाल्याची 'एबीपी माझा'ने दाखवलेल्या बातमीची पुरातत्व विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. 'एबीपी माझा'ने बुरुजाला तडे गेल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्यात आली. पुरातत्व विभागाने जेएसडब्लू (JSW) कंपनीला समुद्रातील काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
जेएसडब्लू कंपनीला दणका
समुद्रात कंपनीच्या सुरू असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रेनिंगच्या कामामुळे बुरुजाला तडे गेल्याचा आरोप पंचांनी केला होता. जेएसडब्लू कंपनीला दणका मिळाला आहे. त्यानंतर आता पुरातत्व विभागाने जेएसडब्लू कंपनीला पत्र लिहून काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. समुद्रात सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्याचे आदेश जेएसडब्लू कंपनीला देण्यात आले आहेत.
जयगड किल्ल्याच्या बुरुजाच्या बातमीची पुरातत्व विभागाकडून दखल
रत्नागिरीमधील जयगड किल्ल्याच्या बुरुजाला कडे घेण्याची बातमी एबीपी माझाने 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल आता केंद्रीय पुरातत्व विभागाने घेतली असून जेएसडब्लू कंपनीला तात्काळ काम थांबवण्याच्या आदेश विभागाने दिले आहेत. समुद्रात कंपनीच्या सुरू असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रेनिंगच्या कामामुळे बुरुजाला तडे गेल्याचा आरोप पंचांनी केला होता. त्यानंतर प्रशासनादेखील तात्काळ केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला पत्र लिहिले होते.
'एबीपी माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
पत्रामध्ये बुरुजाला नेमके कशामुळे तडे गेले? त्याचा अभ्यास करावा अशा आशयाचा मजकूर होता. त्यानंतर आता पुरातत्व विभागाने जेएसडब्लू (JSW) कंपनीला पत्र लिहून काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत कंपनीकडे विचारणा केली असता, आम्हाला याबाबत विचारणा केली जाईल, त्यावेळी याचे उत्तर नक्की देऊ, अशी प्रतिक्रिया कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली होती. त्यामुळे आता कंपनी याबाबत काय निर्णय घेणार? प्रशासन किती कठोरपणे निर्णयाची अंमलबजावणी करणार? हे पहावं लागेल.
रत्नागिरीतील जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला, जबाबदार कोण?
समुद्रात साधारणपणे 200 ते 250 मीटर अंतरावरती होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचा जबाब JSW च्या काही अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी यांना लिहून दिला आहे. ज्यात त्यांनी म्हटंलय, ''किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. त्याला कंपनीचं ड्रेझिंग जबाबदार आहे. पण याबाबतचा कोणताही अहवाल किंवा विचारणा आम्हाला झालेली नाही. त्यामुळे याबाबत अहवाल मिळेल किंवा विचारणा केली जाईल त्यावेळी अधिकृतपणे याला आम्ही उत्तर नक्की देऊ." मंडळ अधिकारी यांच्याकडून हा जबाब अर्थात ही पंचयादी आज तहसीलदारांना दिली जाईल. त्यानंतर तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे हा जबाब सादर करून पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. पाच ते सहा महिन्यांपूर्वी जेट्टीचे काम सुरू झाले. त्यानंतरच हा बुरुज ढासळण्यास सुरुवात झाल्याचं या पंचांचं म्हणणं आहे. जयगड गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक आणि पुरातत्व विभागाकडून जयगड किल्ल्याची देखभाल करण्यासाठी नेमण्यात आलेली व्यक्ती असा चार जणांचा या पंचयादीत समावेश आहे.
समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे बुरूज ढासळला?
किल्ल्याचे बांधकाम शेकडो वर्षे जुने आहे. शिवाय, बुरुजावर झाडे देखील उगवलेली आहेत. त्यामुळे बुरुज ढासळला असावा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. पण त्यानंतर आता समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे पंचांचं म्हणणं आहे. यानंतर आता अभ्यासक असतील किंवा तज्ज्ञांकडून अधिक सखोल अभ्यास केला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान किल्ल्याचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजे. त्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशी मागणी दुर्ग प्रेमी आणि जिल्हावासियांकडून केली जात आहे. दरम्यान, जयगड हा किल्ला केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे देखभालीसाठी देण्यात आलेला आहे. त्यावर JSW या कंपनीचे म्हणणं काय? किंवा कंपनीची बाजू काय? हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.