Holi 2023 : कोकणात तेरेसे शिमगोत्सवाला सुरुवात; चाकरमान्यांच्या उपस्थितीत जल्लोषात सण साजरा
Holi 2023 : कोकणातील तेरेशीचा शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे.
Holi 2023 : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणचा शिमगा पाहण्यासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते. रत्नागिरीच्या ठराविक गावांमध्ये सात-आठ ठिकाणी अशी गावं आहेत की जिथे त्रयोदशीला होम पेटवले जातात. याला तेरेशीचा शिमगा म्हणतात. असाच तेरेशीचा शिमगोत्सव करजुवे गावात चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थांसह मोठ्या जल्लोषात पार पडला.
कोकणातील शिमगोत्सव
कोकणातील हा तेरेशीचा शिमगोत्सवाला दुपारी साडेबाराच्या दरम्यान होळीला होम लागला. होमापूर्वी समस्त करजुवेवासीय, मानकरी, गुरव, डावल आदी मानकर्यांच्या उपस्थितीत मध्यरात्री होळीचा माड उभा करण्यात आला. तर आज सकाळी देवी तळेकरणीच्या सहाणेवर बसलेल्या पालखीची पूजा आर्चा होऊन गुरव मानकऱ्यांच्या हस्ते झाडाखालील होळी देवाची पूजाअर्चा होऊन मंगलाष्टके झाल्या. त्यानंतर सहानेच्या समोरील रात्री उभ्या झालेल्या माडाखाली होली देवाला नेण्यात आले. तळेकरीण देवीच्या पूजा करणाऱ्या गुरवाकडून मिरवणुकीने आणल्यानंतर पुन्हा रितीरिवाजानुसार मंगलाष्टके होऊन होळीसाठी आलेल्या शेकडो भाविकांनी होमाच्या होळीची पाद प्रदक्षिणा केली. तसेच 'होळी रे होळी' या जयघोषासह पाद प्रदक्षिणा करून होळीचा होम पेटविण्यात आला.
होमात नारळ अर्पण करण्याची परंपरा
होळीच्या होमामध्ये परंपरेनुसार नारळ अर्पण करण्यात आले. मानकऱ्यांच्या पाठोपाठ समस्त नव दापंत्यांनी जोड्याने होमामध्ये नारळ अर्पण केले. होमात नारळ अर्पण करण्यासाठी समस्त नवविवाहित जोडपी आपल्या कुटुंबासह येत असतात. होमात नारळ टाकण्याच्या या परंपरेला अत्यंत मोठा मान समजला जातो. होमातील नारळ टाकण्याच्या परंपरेनंतर देवी तळेकरीन देवीची पालखी सहानेवरून उठली आणि समस्त मानकर्यांसह ढोल ताशे सनईच्या वादत्रीमध्ये माड आणि होमासह होळीच्या पेटत्या होमाला पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर माहेरवासीनींसोबत आलेल्या चाकरमान्यांनी नवस केले आणि फेडले.
महत्त्वाच्या बातम्या :
Holi 2023 : धुळ्यात आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळीला सुरुवात; राज्यभरात होळीचा उत्साह