एक्स्प्लोर

Ratnagiri News : योगेश आणि रामदास कदम यांना घेरणार, ठाकरे गट बड्या नेत्याला पक्षात परत आणणार!

Ratnagiri News : दापोली-खेड-मंडणगड या विधानसभा मतदार संघात रामदास कदम आणि योगेश कदम यांना धक्का देण्याची रणनीती आता ठाकरे गटाकडून आखली जात आहे.

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटात गेलेले रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांना धक्का देण्यासाठी ठाकरे गटाने आता रणनीती आखली आहे. माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांची घरवापसी होणार आहे. पुढील पंधरा दिवसात हा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. उद्धव ठाकरे यावेळी हजर राहणार असून खेडच्या गोळीबार मैदानामध्ये जाहीर सभा देखील होण्याची शक्यता आहे. सध्या संजय कदम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार? याबाबतच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. त्याला कारण म्हणजे मूळचे शिवसैनिक असलेले माजी आमदार संजय कदम यांची घरवापसी. दापोली-खेड-मंडणगड या विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि योगेश कदम यांना धक्का देण्याची रणनीती आता ठाकरे गटाकडून आखली जात आहे. त्यासाठी माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याबाबतची सर्व तयारी आणि बोलणी देखील पूर्ण झाली आहेत. संजय कदम यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, सहकारी यांच्याशी शिवसेनेतील प्रवेशबाबत चर्चा केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा पक्षप्रवेश?

सध्या संजय कदम बैठका देखील घेत आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या या प्रवेशाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील हजर राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणे हीच केवळ औपचारिकता असल्याची माहिती सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.

संजय कदम यांच्या येण्याने कशी बदलतील गणितं?

राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर योगेश कदम शिंदे गटात गेले. त्यानंतर कदम यांना आव्हान उभा करणारा तगडा चेहरा कोण? याची चाचपणी सुरु झाली. संजय कदम हे 2014 साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी सूर्यकांत दळवी यांचा पराभव केला होता. पण 2019 मध्ये त्यांना जवळपास दहा हजारांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या ठिकाणी योगेश कदम हे आमदार झाले. त्यामुळे माजी आमदार म्हणून संजय कदम यांची काही मतं आहेत. 

रामदास कदम यांना संजय कदम यांचं आव्हान

शिवाय शिवसेनेचे पाठबळ मिळाल्यास मूळचे शिवसैनिक असलेल्या संजय कदम यांची गणित आणखी सोपी होऊ शकतात असा एक राजकीय अंदाज आहे. हीच बाब लक्षात घेत आता संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.  महाविकास आघाडी झाल्यास  दापोली-मंडणगड-खेड ही विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटेला जाणार आहे. कारण त्या ठिकाणाहून शिवसेनेचे आमदार योगेश कदम निवडून आले होते. हीच बाब लक्षात घेत शिवाय रामदास कदम यांना तगडं आव्हान उभे करण्यासाठी संजय कदम यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 25 January 2025100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 5 PM : 25 January 2025Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Embed widget