(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratan Tata Death: तेरे जैसा यार कहा...! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचे डोळे पाणावले
Ratan Tata Death: रतन टाटा यांचा स्वीय सहाय्यक शांतनू नायडूचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच भावूक झाले.
Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आज सकाळी कुलाबामधील त्यांच्या निवासस्थानी रतन टाटा (Ratan Tata) यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सकाळी 10.30-11 वाजताच्या सुमारास रतन टाटा यांचं पार्थिव एका गाडीमधून मुंबईतील एनसीपीए येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. यादरम्यान रतन टाटा यांचा 31 वर्षीय जिवलग मित्र आणि स्वीय सहाय्यक शांतनू नायडू (Shantanu Naidu) देखील होता. रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेल्या गाडीच्या पुढे शांतून बाईकद्वारे हळूहळू पुढे जात रस्ता मोकळा करत होता. शांतनूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून सर्वच भावूक झाल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
'गुडबाय, माय डियर लाईटहाऊस'; शांतनूची भावनिक पोस्ट-
रतन टाटांसोबतच्या मैत्रीने मला खूप काही दिलं. त्यांच्या जाण्याने या मैत्रीत आता पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य घालवीन. प्रेमाची किंमत दु:ख ही आहे. गुडबाय, माय लाईटहाऊलस…, अशी भावूक पोस्ट शांतनूने केली आहे.
कोण आहे शांतनू नायडू?
शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पुणे येथे झाला. खुद्द रतन टाटा यांनी फोन करुन, तू माझ्याबरोबर काम करणार का? अशी विचारणा शांतनूला केली होती. अनेकदा नवीन स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात सल्ले रतन टाटा शांतनूकडून घेतात, असेही सांगितले जाते. भटक्या श्वानांसाठी केलेल्या कामामुळे रतन टाटा यांची शांतनूसोबत जवळीक वाढली. शांतनूच्या कामाने टाटा खूप प्रभावित झाले होते. 2018 पासून रतन टाटा यांच्यासोबत शांतनू काम करत आहे. शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. गुडफेलोज या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.