Ramdas Marbade Success Story: जिद्दीला सलाम! पाणीपुरी विकणार्या रामदास मारबदेची गरुडझेप; इस्रोमध्ये तंत्रज्ञ पदावर झाली निवड
Ramdas Marbade Success Story Gondia: परिस्थिती हे तुमच्या अपयशाचे कारण ठरू शकत नाही, असाच काहीसा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील खैरबोडी येथील रामदास मारबदे याच्या बाबतीत अगदी तंतोतंत ठरला आहे.

Ramdas Marbade Success Story Gondia: परिस्थिती हे तुमच्या अपयशाचे कारण ठरू शकत नाही, असाच काहीसा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील रामदास मारबते याच्या बाबतीत अगदी तंतोतंत ठरला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी पाणीपुरी विक्रीचा ठेला चालवीत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ न देता या युवकाने कठोर परिश्रम आणि अभ्यास करून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) तंत्रज्ञ म्हणून स्थान मिळवले आहे. या युवकाने गाठलेल्या यशाच्या पल्ल्याने संपूर्ण तिरोडा तालुकावासीयांची मान उंचावली आहे. तर त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर सुद्धा नवा आदर्श ठेवला आहे.
सोलापूर महानगरपालिका अन् इस्रो या दोन्ही ठिकाणी सलग निवड
कुठलेही काम छोटे अथवा मोठे नसते. तर ते वेळेत होणे हे महत्त्वाचे असते. मनात जिद्द, चिकाटी आणि ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांमध्ये सातत्य असले तरी नक्कीच यश प्राप्त करता येते. नेमकी हीच बाब गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरबोडी (नंदनगर) येथील रामदास हेमराज मारबते या युवकाने सिद्ध करून दाखविली आहे. अल्पसंसाधन, कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) तंत्रज्ञ पदावर स्थान मिळवले आहे.
रामदास मारबदेने उदरनिर्वाहासाठी गावात पाणीपुरीचा ठेला चालविला, पण यासोबतच त्याने शिक्षण आणि अभ्यास सुरूच ठेवला. त्याने राज्य व केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत सोलापूर महानगरपालिका आणि इस्रो या दोन्ही ठिकाणी सलग निवड मिळवली. त्यांचे वडील हेमराज मारबदे हे शिक्षण विभागात चतुर्थश्रेणी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते शेती सोबतच पशुपालन करत आहेत. आई अंजना मारबते गृहिणी असून कुटुंबात दोन भाऊ व दोन बहिणींसह एकूण पाच सदस्य आहेत.
अभ्यासाचे योग्य नियोजन, दैनंदिन कामे करून गाठलं यश!
रामदासने दहावी, बारावी, आयटीआय (पंप ऑपरेटर मेकॅनिक) आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी प्राप्त केली. इस्रोसाठी त्यांचा प्रवास 2019 मध्ये सुरू झाला. यादरम्यान, त्याचा विवाह झाला आणि त्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत अभ्यासात सातत्य ठेवीत त्याने हे यश प्राप्त केले. रामदासने गावात पाणीपुरीचा ठेला चालवीत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. अभ्यासाचे योग्य नियोजन केले. दिवसातून एकदा जेवण करायचा, दैनंदिन कामे करून, अभ्यास करून हा यशाचा पल्ला गाठला. विशेष म्हणजे हे सर्व करीत असताना त्यांने कुंटुबाकडे दुर्लक्ष होवू दिले नाही. त्याच्या या भरघोस यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI






















