Raksha Bandhan 2024 : फॅन्सी वैगेरे नको, यंदा भावाला त्याच्या राशीनुसार बांधा राखी; लाभेल दीर्घायुष्य, आरोग्यही राहील उत्तम
Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या राशीच्या रंगानुसार राखी बांधली पाहिजे, यामुळे तुमच्या भावाला त्याचा विशेष लाभ होऊ शकतो, त्याला चांगलं आरोग्य लाभू शकतं.
Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा भाऊ-बहिणीतील अतूट प्रेमाचा सण आहे. यावेळी हा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि आपल्या भावाच्या प्रगती आणि समृद्धीची कामना करतात. भाऊ बहिणीला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार भेटवस्तू देतो. ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार राखी बांधली तर तुमच्या भावाचं निद्रीस्त भाग्य उजळू शकतं, तुमच्या भावाची चांगली प्रगती होऊ शकते.
राशीनुसार बांधा राखी
मेष रास (Aries)
जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर तुम्ही तुमच्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता. यामुळे सौभाग्य वाढतं आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात.
वृषभ रास (Taurus)
जर तुमच्या भावाची राशी वृषभ असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हिरव्या रंगाची राखी निवडावी. हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावाचं जीवन आनंदाने भरते.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या भावांसाठी जांभळ्या रंगाची राखी शुभ मानली जाते, यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल.
कर्क रास (Cancer)
जर तुमच्या भावाची राशी कर्क असेल तर तुम्ही त्याच्या मनगटावर पिवळ्या रंगाची राखी बांधावी. यामुळे भावाची आर्थिक स्थिती उंचावते.
सिंह रास (Leo)
जर तुमचा भाऊ सिंह राशीचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी लाल रंगाची राखी निवडावी. सूर्य सिंह राशीत राहतो, म्हणूनच लाल रंगाची राखी तुमच्या भावासाठी शुभ ठरेल.
कन्या रास (Virgo)
जर तुमचा भाऊ कन्या राशीचा असेल तर तुम्ही त्याला पांढऱ्या रंगाची किंवा क्रिम कलरची राखी बांधावी. यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येतो आणि पैसाही येतो.
तूळ रास (Libra)
जर तुमच्या भावाची रास तूळ असेल तर तुम्ही त्याला जांभळी किंवा हिरवी राखी बांधावी. यामुळे भावाचं जीवन नेहमी आनंदाने भरलेलं राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या भावाच्या पांढऱ्या रंगाची राखी बांधावी. यामुळे त्यांचे भाग्य वाढेल आणि पैसा येण्याचा मार्गही खुला होईल.
धनु रास (Sagittarius)
जर तुमचा भाऊ धनु राशीचा असेल तर तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर केशरी रंगाची राखी बांधावी. यामुळे त्याला सरकारी योजनांचा फायदा होऊ शकतो, काही जुनी प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या भावाने लाल किंवा केशरी रंगाची राखी बांधावी, यामुळे भावाला खूप फायदा होईल. विशेषत: जर तो मानसिक ताणातून जात असेल तर त्याला त्यातून आराम मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
जर तुमचा भाऊ कुंभ राशीचा असेल तर त्याला गडद हिरव्या रंगाची राखी बांधा. गडद हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावाच्या जीवाचं रक्षण करेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या भावांसाठी लाल रंग शुभ मानला जातो. ही राखी तुमच्या भावाला सर्व आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Raksha Bandhan 2024 : भद्राकाळात राखी का बांधू नये? शास्त्रात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या