एक्स्प्लोर

Shiv Sena Clash : महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा; गोगावले यांच्याविरोधातील मोर्चाने वातावरण तापलं

Raigad News : महाडमध्ये शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, सध्या परिसरात तणाव आहे.

Shiv Sena Clash :  शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांच्यात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर येत असतात. अशातच आज त्यात आता महाडची (Mahad) भर पडली आहे. शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale)  यांच्याविरोधातील ठाकरे गटाचा मोर्चा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यावरून दोन्ही बाजूंनी हमरीतुमरी होऊन बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आणखी चिघळली नाही. या घटनेनंतर आता थंडीत महाडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. 

महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने परिसरात तणावाचं वातारण निर्माण झालं आहे. आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरून या दोन्ही गटात जुंपली. नागपूर अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना केलेल्या वक्तव्यावरून हा राडा झाल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भरत गोगावले यांनी 'बाळासाहेब ठाकरे आता वर गेले आहेत. त्यांचे मत जाणून घ्यायचे असेल तर कोणाला तरी वर जावं लागेल' असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाडमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आमदार गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी  आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यावेळी हा राडा झाला. तब्बल दीड तास हा राडा सुरू होता.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुकी करत होते. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाही राडा 

याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. यावेळी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Embed widget