(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raigad Crime News : अलिबागमधून दागिने आणि रोख रक्कमेसह पळून गेलेल्या महिलेला अटक, 2.85 लाख रुपयांचे दागिने हस्तगत
Maharashtra Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील (Raigad Crime News) अलिबाग (Alibag News) येथे फसवणूक करून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या महिलेला अटक करण्यात यश आलं आहे.
Maharashtra Raigad Crime News : रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग (Alibag New) येथे फसवणूक करुन दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी महिलेकडून सुमारे 2.85 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 54 वर्षीय आरोपी मंगल मोरे उर्फ विमल सूर्यवंशी या महिलेला अटक करण्यात आली आहे.
सातारा (Satara News) जिल्ह्यातील जावळी येथील मूळ रहिवासी असलेल्या 54 वर्षीय आरोपी मंगल मोरे उर्फ विमल सूर्यवंशी ही महिला आपण उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून भाड्याच्या खोलीत राहत होती. यासाठी, बनावट ओळखपत्र आणि आधारकार्डचा वापर तिनं केला होता. याचदरम्यान, घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेचा विश्वास संपादन करून पूजेला जाण्याच्या बहाण्यानं त्या महिलेचे दागिने घेऊन महिला पसार झाली. यामुळे, मंगल उर्फ विमल विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करण्यात आला असता फरार आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील (Raigad Crime News) अलिबाग (Alibag News) येथे फसवणूक करून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या महिलेला अटक करण्यात यश आलं आहे. या आरोपी महिलेकडून सुमारे 2.85 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर तिच्याकडून दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपी महिलेकडे सखोल चौकशी केली असता तिनं अलिबाग आणि पोयनाड येथे अशाच पद्धतीनं गुन्हे केले असल्याची कबुली दिली. तर, आरोपी महिलेनं नोकरीचे आमिष देऊन आणि भिशीचे रोख पैसे घेऊन फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. तसेच, या महिलेनं पुणे, लातूर, बीड आणि रायगड जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :