Aurangabad: औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चंदन चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Crime: या चोरट्यांनी औरंगाबादसह इतर जिल्ह्यात सुद्धा चंदन चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादसह राज्यातील जालना, सोलापूर, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात चंदन चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या चोरांना पकडण्यात आले आहे. यांच्याकडून चोरी गेलेल्या चंदनाच्या लाकडासह 38 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नसीबखान मुनीरखान (वय 22 वर्षे), असलमखाँ भुरेखॉ (वय 25 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्याविरुद्ध शहरातीलही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोबतच त्यांच्या आणखी सात साथीदारांचे नावं समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, औरंगाबाद शहरात चंदनचोरीचे गुन्हे करणारे टोळीतील दोन इसम हे पळशी फाटयाकडुन चोरी केलेले चंदन विक्रीसाठी घेवुन जाणार आहे. खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पोलिसांनी पळशी चौकातून पिसादेवीकडे जाणाऱ्या सांवगी ते कॅम्ब्रीज रोडवर सापळा रचला. यावेळी पोलिसांनी नसीबखान आणि असलमखाँ तिथे येताच त्यांना पकडून ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने विविध चंदन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
यांच्या मदतीने केली चोरी...
नसीबखान आणि असलमखाँ यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्या इतर साथीदारांचे सुद्धा नावं सांगितले. ज्यात मुजीबखॉ महेबुबखॉ, रईसखॉ गौसखॉ, अनीस, हैदर, आसीफ व त्याचे ओळखीचे दोन जण मशीद आणि उजेर यांच्यासोबत मिळून चंदन चोरी केल्याची कबुली दिली. या सर्व टोळीने औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालत, वेदांतनगर पोलीस ठाणे हद्दीत 3, छावणी पोलीस ठाणे हद्दीत 1, एम. सिडको पोलीस ठाणे हद्दीत 2, एम. सिडको पोलीस ठाणे हद्दीत 1 , पुंडलीकनगर पोलीस ठाणे हद्दीत 1 असे एकूण आठ ठिकाणी चंदन चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.
इतर जिल्ह्यात सुद्धा केल्या चोऱ्या...
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही चोरट्यांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने फक्त औरंगाबादच नव्हे तर अंबड, सोलापुर, नाशिक, अहमदनगर जिल्हयात सुद्धा बरेच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तर सर्व गुन्हयातील चोरीस गेलेले चंदनाचे झाडाचे खोड (मुद्देमाल) हा त्यांनी इलीयास खान रईसखान (रा. माहुली आडगांव ता.जि. औरंगाबाद) यास विक्री केल्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतेलेल्या आरोपींना मुद्देमालासह वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Lumpy Skin Disease: औरंगाबादच्या पाच तालुक्यात 'लंपी'चा प्रादुर्भाव, अशी घ्या काळजी
CM Eknath Shinde: 'या' दहा कारणांमुळे गाजला मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा