एक्स्प्लोर

माथेरानच्या 1200 फुट खोल दरीत प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकरचा मृतदेह सापडला, हॉटेलमधून बाहेर पडताना CCTVत दिसले अन्...

किंग जॉर्ज व्ह्यू पॉइंट क्लिफवरून अंदाजे 1200 फूट खोल दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Raigad: बंगळुरूचे सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि प्राध्यापक शणमुगा एस. बालासुब्रमण्यन यांचा मृतदेह रविवारी माथेरानमध्ये आढळला. ते 58 वर्षांचे होते. प्राध्यापक बालासुब्रमण्यन एका कंपनीच्या व्यवस्थापन टीमला मार्गदर्शन करण्यासाठी माथेरानमध्ये आले होते. किंग जॉर्ज व्ह्यू पॉइंट क्लिफवरून अंदाजे 1200 फूट खोल दरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 15 ऑक्टोबरच्या सकाळी हॉटेलमधून बाहेर पडताना त्यांचा शेवटचा फोटो सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला. (influencers body found in matheran)

शणमुगांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी माथेरान पोलिसांनी सोशल मीडियावर मोहीम राबवली. त्यानंतर हॉटेलमालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला. अद्याप पोलिसांसाठी हे स्पष्ट झालेले नाही की, प्राध्यापक बालासुब्रमण्यन यांचा मृत्यू अपघातामुळे दरीत कोसळल्याने झाला की त्यांनी आत्महत्या केली. व्ह्यू पॉइंटवरील रेलिंग तुटलेले नसल्यामुळे अपघाताची शक्यता कमी आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी गिर्यारोहकांची टीम 

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने सांगितले की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी लोणावळ्याहून तज्ज्ञ गिर्यारोहकांची टीम बोलावण्यात आली होती. 17 जणांच्टीया टीमने दोरीच्या साहाय्याने खाली उतरून मृतदेह स्ट्रेचरमध्ये गुंडाळून वर आणला. शनिवारी काही आदिवासींनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. प्राध्यापक बालासुब्रमण्यन यांनी कंपनीला माथेरान भेटीबाबत आगाऊ माहिती दिलेली नव्हती. कार्यक्रमास उपस्थित नसल्यामुळे कंपनीने चौकशी सुरु केली होती.

पोलीस तपास सुरु 

माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेसाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे, जेथे वर्षभर अनेक पर्यटक भेट देतात. पोलिसांनी सांगितले की, "बहुतेक लोक दरीत पाहण्यासाठी रेलिंग ओलांडतात. शणमुगाही असे काही प्रयत्न करत होते का, किंवा कोणी पाहिले होते का, हे शोधणे सुरु आहे." शणमुगांना खोल दरीत पडल्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. रेलिंगच्या फटीतून ते खाली पडले की काय, हे तपासणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. सुरुवातीला त्यांना बेपत्ता म्हणून नोंदवले गेले, परंतु आता या घटनेला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले आहे. प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे.

माथेरानमधील या घटनेने स्थानिक रहिवाशांना तसेच पर्यटकांना धक्का बसला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या घटनेच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहेत. घटनास्थळी उपस्थित तज्ज्ञ गिर्यारोहकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढल्याने हा ऑपरेशन सुरक्षेने पूर्ण केला गेला.स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे, तसेच दरीजवळ जाण्यासाठी योग्य रेलिंग आणि सुरक्षा उपाय पाळण्याचे निर्देश दिले आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget