मोठी बातमी : राहुल पांडे राज्याचे नवे मुख्य आयुक्त; तर गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर विभागीय आयुक्त!
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विभागीय माहिती आयुक्तपदी गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई : राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे (Rahul Pandey Chief Information Commissioner) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विभागीय माहिती आयुक्तपदी गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
राहुल पांडे हे नागपूरचे पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारितेत काम केले आहे. यापूर्वी ते नागपूर विभागाचे माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. माहितीच्या अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांची लेखनशैली आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी असलेली भूमिका या नव्या पदावर उपयोगी ठरणार आहे. गजानन निमदेव हे देखील नागपूर येथील पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांनी सामाजिक विषयांवर दीर्घकाळ काम केले आहे.
पुढील तीन वर्षांचा असणार कार्यकाळ
रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) हे माजी आयएएस अधिकारी असून त्यांना प्रशासनातील दीर्घ अनुभव आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त अशा पदांवर काम करत नागरिकाभिमुख प्रशासनावर भर दिला आहे. प्रकाश इंदलकर (Prakash Indalkar) हे माजी प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्या अनुभवाचा फायदा माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीत होणार आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी विकास क्षेत्रात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. या चौघांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा असणार आहे. नागरिकांना वेळेत आणि योग्य माहिती मिळावी, प्रशासनातील पारदर्शकता वाढावी या दृष्टिकोनातून या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या नव्या नियुक्त्यांमुळे माहिती आयोगाची कार्यक्षमता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















