एक्स्प्लोर
फोटो काढण्याच्या नादात पवना धरणात दोघे बुडाले
फोटो काढण्याच्या नादात दोघेजण बुडाल्याची घटना पुण्यातल्या पवना धरणात घडली आहे. कासारसाई बॅकवॉटरमध्ये हा प्रकार घडला असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे.

पिंपरी : फोटो काढण्याच्या नादात दोघेजण बुडाल्याची घटना पुण्यातल्या पवना धरणात घडली आहे. कासारसाई बॅकवॉटरमध्ये हा प्रकार घडला असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे. आज रविवारी सकाळी पुण्यातल्या 9 मुलांचा गृप फिरण्यासाठी पवना धरणाजवळच्या कासारसाईमध्ये गेला होता. तेव्हा काही जण फोटो काढण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. पण त्यातल्या एकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी मारली, पण दुर्दैवाने तोही बुडाला. त्या पाठोपाठ आणखी दोघांनी उड्या मारल्या. पण त्या दोघांना स्थानिकांनी वाचवलं. बुडालेल्या तरुणांपैकी एकाचे नाव वेदप्रकाश राणा आणि दुसऱ्याचे मोहित जाधव असं नाव आहे. दोघे पुण्यात एका खाजगी कंपनीत कामाला होते. दरम्यान या दुर्घटनेत बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध अजूनही सुरु आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळाकडे रवाना झालं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























