एक्स्प्लोर

Pune Crime News: आक्षेपार्ह व्हिडियो पोस्ट केल्याप्रकरणी तृतीयपंथींयाकडून महिलेला बेदम मारहाण

कन्टेंन्ट क्रिएटर विजया गावडे या सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवतात. आक्षेपार्ह व्हिडियोचा राग आल्याने तृतीयपंथीयांनी विजया यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

Pune Crime News: कन्टेंन्ट क्रिएटर विजया गावडे या सोशल मीडियासाठी एक व्हिडियो बनवतात. ज्या व्हिडियोत ट्रान्सजेंडर समुदायाद्वारे पाळल्या जाणार्‍या काही विचित्र विधींचे वर्णन करत होत्या. मात्र एका तृतीयपंथीला व्हिडिओचा राग आल्याने तृतीयपंथीयांनी विजया यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

शिवलक्ष्मी झाल्टे या तृतीयपंथी महिलेला व्हिडिओ आक्षेपार्ह वाटला. तृतीयपंथी समाजाची थट्टा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी शिवलक्ष्मी झालटे यांनी नाशिकमध्ये गावडे यांच्या विरोधात 2019 च्या ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे गावडेला ताब्यात घेण्यात आले होते आणि जामिनावर सुटका करण्यात आली होती. 

विजया गावडे या मूळच्या बारामतीच्या रहिवासी असून त्यांवी झालटे यांनी शिक्षा करण्याची धमकी दिल्यानंतर यापूर्वी माफी मागितली होती. झालटे यांनी रेकॉर्ड करून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये गावडे यांनी नंतर माफी मागितली, परंतु ते पुरेसे नव्हते. आपल्या मुलाची जाहीर बदनामी केली जाईल, असे सांगून तिने गावडे यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. 

झालटे यांनी विजया यांना विश्रांतवाडीतील एका इमारतीत बोलावून घेतले आणि पुन्हा एकदा सर्वांची माफी मागा, असं सांगितलं होतं. त्यावेळी झालटे आणि काही व्यक्तींनी गावडे यांना मारहाण केली. सोशल मीडियाच्या वापरासाठी या कृत्याचे चित्रीकरण करताना त्यांनी तिच्या गळ्यात चपलांची माळाही बांधली होती. सागर शिंदे, शिवलक्ष्मी झाल्टे, मोहिनी हजारे, अनुजा लोहार, अश्विनी जाधव, संजीवनी राणे आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पाच स्त्री-पुरुषांची नावे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आहेत. त्यांच्यावर कलम 143 , 147 , 324, 323, 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडियो समोर येत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाईसुद्धा होत आहे. मात्र यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे, असं तज्ञांचं मत आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget