एक्स्प्लोर

Sanjay Raut: महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार? संजय राऊतांनी दिलं रोखठोक उत्तर, म्हणाले, 'मुंबईत आम्हाला लढावचं लागेल...'

Sanjay Raut: महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती, त्याबाबत आज शिवसेना ठाकरेंच्या पक्षांचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात रोखठोक भाष्य केलं आहे.

पुणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश, अपयश यासर्व घडामोडींवर सर्व राजकीय पक्ष चर्चा, बैठका आणि पुन्हा एकदा पक्षबांधणी करत आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसत आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती, त्याबाबत आज शिवसेना ठाकरेंच्या पक्षांचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात रोखठोक भाष्य केलं आहे. 

नेमकं काय म्हणालेत संजय राऊत?

पुन्हा एकदा पक्ष बांधणी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बैठका सुरू आहेत. महानगरपालिका निवडणूक सरकारच्या मनात आलं लवकर पार पडतील. त्यांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. त्यामुळे आता त्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय ते घेतील. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड, पुणे येथील कार्यकर्त्यांचं मनोबल जाणून घ्यावं, यासाठी आज आमच्या दिवसभर बैठका आहेत. विधानसभेचा चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षोंवर्ष आम्ही निवडणूक लढतोय. पण गेल्या दहा वर्षात अशा ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहे. ते गेल्या 70 वर्षात मी पाहिला नाही. तरीही महाराष्ट्रात, देशात लाखोंच्या संख्येने आम्हाला मतदान झालेलं आहे, आम्ही तुम्हाला मतदान केलं मात्र काय झालं माहिती नाही अशी विविध लोकांना शंका आहे. आम्ही तुम्हालाच मतदान केलं आहे आणि म्हणूनच मग त्या मारकटवाडी सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या, अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. त्या लोकांच्या संतप्त भावना आहेत. त्याचा आम्ही आदर करतो. त्याचा स्वीकार करतो असंही संजय राऊत यांनी पुढे म्हटलं आहे. 

ज्यांच्या हातामध्ये ईव्हीएम त्यांच्या हातामध्ये सत्ता

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वबळाचा तयारी असणार आहे का या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी आहे. स्वबळाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आम्ही भारतीय जनता पक्षासोबत असताना स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढवल्या होत्या. ही कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते. लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते. स्थानिक स्वराज्यला परत वाढते. लोकसभेला आमच्या निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा फार खेचा तानी नव्हती आणि विधानसभेला तुम्हाला दिसले असेल काही जागा आम्हाला वाटत होतं, आम्हाला मिळाल्या पाहिजे. ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढू शकलो असतो आणि जिंकू शकलो असतो. त्या आम्हाला मिळाल्या नाहीत. राष्ट्रवादीला मिळाल्या नसतील. काँग्रेसला मिळाल्या नसतील. पण खेड आळंदीची जागा आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती. जुन्नरची जागा जरी आम्ही लढलो असतो, तर आम्ही शंभर टक्के जिंकलो असतो. अशा अनेक जागांवरती शिवसेनेचा पहिल्यापासून एक ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल अमुक अमुक जागा आमच्या ताब्यात असायला हवी, काँग्रेसला वाटलं असेल पण आता निवडणुकीत आघाडी असते, तेव्हा दोन-तीन पक्षाची तेव्हा हे असं होत असतं, आपल्या देशामध्ये ज्यांच्या हातामध्ये ईव्हीएम त्यांच्या हातामध्ये सत्ता असं समीकरण झालेला आहे, पण ठीक आहे यातून मार्ग निघेल पुढे जाऊ असही संजय राऊत पुढे म्हणाले आहेत. तर खेड आळंदीची जागा आम्हाला शेवटी भेटली आणि आम्ही ती जिंकून दाखवली हेच मी तुम्हाला सांगतो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटला आहे. 

हडपसरची जागा प्रशांत जगताप यांच्या ऐवजी तुम्हाला भेटली असती तर ती जिंकले असती का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांना तशी खात्री होती. हडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढवली आणि फार थोड्या मताने त्यांचा पराभव झाला. आम्ही कुठे आम्ही पडलो. कुठे काही घातपात झाला यासाठी आम्ही तिन्ही पक्षांनी चर्चा केली आहे, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत असेही पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

 स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांचं ऐकणार का?

महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांचं ऐकणार का? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही नक्की कार्यकर्त्यांचं ऐकणार आहे. त्याबाबत विचार करणार आहोत. मुंबई महानगरपालिका हा फार कळीचा मुद्दा असतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि आम्ही दहा जागा जिंकल्या इतक्या कठीण परिस्थितीत, आम्ही दहा जागा जिंकल्या मात्र, आमच्या चार जागा फार कमी मतांनी हरल्या. मुंबई महानगरपालिका आम्हाला काहीही करून आता  मिळवावी लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल, असेही संजय राऊत म्हणाले. 

मुंबई महानगरपालिकेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्ही सर्वजण बसून चर्चा करू. कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो, शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद आहे. मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखी काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो, पण तसं होऊ शकलं नाही. आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची मानसिकता आहे. मी मुंबई पुरतं बोलतोय याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षासोबत असताना देखील महानगरपालिका स्वतंत्रपणे लढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढले आहेत.पुणे, पिंपरी, चिंचवड, नाशिक मध्ये महाविकास आघाडी आहे. मुंबईचं महत्त्व राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर फार वेगळा आहे, तिथे जर शिवसेनेची ताकत नसेल तर शंभर टक्के आज मुंबईला ओरबाडणे सुरू आहे, उद्या नक्की तुकडा पडेल, असं संजय राऊत म्हणालेत. 

तीन पक्षांच्या भावना असतात. युतीधर्म असतो तो पाळला गेला पाहिजे. भाजपमध्ये असताना देखील आम्ही युती धर्म पाळला होता. आमच्या अनेक महत्त्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागांवरती कायमस्वरूपी त्यांनी कब्जा केला. त्या आमच्या जागा असायच्या. पण जागा वाटपामध्ये मागणी असायची काही मत विभागली जाऊ नये. त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या. आणि तीन पक्ष असल्यावर सुद्धा अशा घटना घडत असतात, असेही संजय राऊत यांनी पुढे म्हटला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; दाट धुक्यामुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनवर परिणाम, रेल्वे वाहतूक मंदावली
मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; कर्जत, कसारा परिसरात धुक्याची चादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkot Fort Update : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार #ABPmajhaDhananjay Munde : विधानसभा कामकाजात आज पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे सहभागी होणारABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 December  2024TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
महायुतीत खातेवाटप नेमकं कधी होणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, रायगडच्या पालकमंत्रीपदावरही महत्त्वाचं भाष्य; म्हणाले...
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
धबधब्यावर तरुण-तरुणीला विवस्त्र केले; पैसे काढून घेतले, पीडिता म्हणाली, मी विनवणी करत राहिलो, त्यांनी मला नग्न केले
Mumbai Boat Accident: नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:चा जीव देऊन मोठा अनर्थ टाळला, अन्यथा नीलकमल बोटीचा स्फोट....
मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; दाट धुक्यामुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनवर परिणाम, रेल्वे वाहतूक मंदावली
मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; कर्जत, कसारा परिसरात धुक्याची चादर
ऑस्करच्या शर्यतीत असलेला युकेचा हिंदी सिनेमा आता होणार भारतात प्रदर्शित, 'या' दिवसापासून 'संतोष' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
ऑस्करच्या शर्यतीत असलेला युकेचा हिंदी सिनेमा आता होणार भारतात प्रदर्शित, 'या' दिवसापासून 'संतोष' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
धक्कादायक! पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, लोखंडी पाईप, हातातील कड्यानं बेदम मारहाण
धक्कादायक! पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, लोखंडी पाईप, हातातील कड्यानं बेदम मारहाण
D Gukesh Tax : विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
विश्वविजेत्या गुकेशसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 4.67 कोटींचा कर माफ, आता मिळणार तब्बल इतके कोटी रुपये!
फडणवीसांच्या बंगल्यावर खातेवाटप? अजित पवार आरोपांची राळ उडालेल्या धनंजय मुंडेंना स्वत:च्या गाडीतून घेऊन निघाले
फडणवीसांच्या बंगल्यावर खातेवाटप? अजित पवार आरोपांची राळ उडालेल्या धनंजय मुंडेंना स्वत:च्या गाडीतून घेऊन निघाले
Embed widget