एक्स्प्लोर

Vishal Agrawal Pune Car Accident : वडिलांसाठी सरप्राईज प्लॅन केला त्याआधीच भरधाव वेगानं अश्विनीचा जीव घेतला; आईनं रुग्णालयाबाहेरच फोडला टाहो!

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारने दोघांना चिरडरलं. त्यात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक दोघांचा मृत्यू झाल्याने दोघांच्याही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पुणे : पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोर्शे कारने (Porsche Car)  दोघांना चिरडरलं. त्यात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक दोघांचा मृत्यू झाल्याने दोघांच्याही कुटुंबियांना (Pune Car Accident) मोठा धक्का बसला आहे. त्यात अश्विनी कोस्टा हिच्या आईने लेकीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रोश केला. अश्विनी तिच्या वडिलांना सरप्राईज देण्यासाठी गावी जबलपूरला जाणार होती. मात्र त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

अश्विनी कोस्टाच्या आईने ससून रुग्णालयात येऊन लेकीचा मृतदेह पाहताच टाहो फोडला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, अश्विनी आणि माझं शनिवारी रात्री बोलणं झालं होतं. ती 18 जूनला जबलपूरच्या येणार होती. तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने सरप्राईज प्लॅन केला होता. मात्र दुर्देवाने देवाने तिला आम्चायपासून कायमचं हिरावून घेतलं. एका श्रीमंत बापाच्या मुलाच्या चुकीने आम्ही आमची लेक गमावली. एखाद्याच्या मुलाच्या हुल्लडबाजीची शिक्षा आमच्या मुलीला झाल्याचंदेखील तिची आई म्हणाली. 

अश्विनी ही मुळची जबलपूरची आहे. ती इंजिनिअर होती. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतलं आहे.  अश्विनी आणि अनिश दोघेही जॉन्सन कंट्रोल कंपनीत काम करत होते. या कंपनीच त्यांनी मैत्री झाली आणि त्यानंतर दोघे पार्टीला वगरे जात असत. मात्र ही पार्टी दोघांचीही शेवटची पार्टी ठरली. 

गाडीची नोंदणींच नाही!

ज्या पोर्शे कारने दोघांचा जीव घेतला त्या कारसंदर्भात आता धक्कादायक  माहिती समोर आली आहे. वेदांतने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल सापडला, पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या

Vishal Agrawal Pune Car Accident : पुणे पोर्शे कार अपघाताची धक्कादायक माहिती उघड, RTO पोलीस काय म्हणाले..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget