(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे. आज दुपारी राजगृहावर वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे.
पुणे : वसंत मोरे(Vasant More) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेणार आहे. ते राजगृहावर दाखल झाले आहेत. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरु आहेत. 'मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. मला आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊ द्या. त्यांची भेट घेतल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर बोलेल मात्र काहीही झालं तरी मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे अनेक राजकीय (Pune Lok Sabha Constituency) नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या प्रमुख्य नेत्यांची भेट घेतली. शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचीदेखील भेट घेतली होती.
वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत आठ उमेदवार हे जाहीर केले आहेत. त्यांनी पुणे लोकसभेसाठी कोणताही उमेदवार घोषित करण्यात आला नाही आहे. त्यामुळे वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे हे मराठा समाजाच्या बैठकीत दिसले होते. त्यामुळे ते मराठा समाजाचे उमेदवार असू शकतात, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मात्र वसंत मोरेंना माध्यमांशी बोलण्यासाठी मराठा समाजाच्या काहींनी हटकलं आणि हेी वागणूक पाहून वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीतून थेट निघून गेले होते. या प्रकारानंतर ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता ते प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन पुणे लोकसभेसाठी इच्छूक असल्यचं सांगू शकतात किंबहूना उमेदवारी मागू शकतात. मात्र त्यांच्या भेटीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भेटीगाठी घेऊन उमेदवारी मिळेल?
मी पुणे लोकसभा लढण्यासाठी इच्छूक आहे, असं सांगत वसंत मोरे अनेक नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहे. शरद पवार, संजय राऊत त्यानंतर रवींद्र धंगेकरांचीदेखील त्यांनी भेट घेतली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर मराठा समाजाची मदत मिळण्याची शक्यता दिसली त्यामुळे त्यांच्या बैठकीला हजेरी लावली आता प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. कोणाकडूनही उमेदवारी मिळाली नाही तर वसंत मोरे अपक्ष लढतील अशाही चर्चा रंगत आहेत.
इतर महत्वाची बातमी-