एक्स्प्लोर

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार

वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात

मुंबई : मनसेला जय महाराष्ट्र करुन लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले महाराष्ट्र पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) चर्चाही केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वसंत मोरेंना फोन करुन शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून लोकसभा उमेवारीची खात्री नसल्याने त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. आता, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही समजते. पुढील आठवड्यात 9 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. वसंत मोरे यांनी मनसेत वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे मनसेला जय महाराष्ट्र केला होता. यावेळी, राज ठाकरेंबद्दल आपली नाराजी नसून काही वरिष्ठांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी मनसे सोडल्याने ते शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे, ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात, असेही बोलले जात. मात्र, ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे, त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन आपली पुढील राजकीय वाटचाल नव्याने सुरू केली होती. मात्र, निकालानंतर महिनाभरातच त्यांनी वंचितला सोडून शिवसेनेची कास धरल्याचं दिसून आलं.

विधानसभा लढवणार 

आता पक्ष प्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल. मी वंचित मध्ये गेलो होतो. मात्र, मतदारांनी मला स्वीकारलं नाही. या अगोदर मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत  कडव आव्हान देऊ असेही मोरेंनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले.  मला दोन पर्याय आहेत, खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून मी विधानसभा लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता, तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत, असेही मोरेंनी म्हटले.

वसंत मोरेंचं डिपॉझिटही जप्त

मनसे सोडल्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीने पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर त्यांनी प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. पण, त्यांना लोकसभा निवडणुकीत छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला. वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. वसंत मोरेंना लोकसभा निवडणुकीत केवळ 32,012  मतं मिळाली आहेत. त्यांचे डिपॉझिटही जप्त झालं आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत, राज ऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार, 'मातोश्री ' वर भेट घेणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानातDevendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीसSadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Embed widget