(Source: Poll of Polls)
Vaishnavi Hagawane Pune Crime: मयुरी हगवणे प्रकरणाकडे दुर्लक्ष, आरोपी सत्ताधारी पक्षाचा असल्याने वाचला, शरद पवार गटाची महिला आयोगावर आगपाखड
Vaishnavi Hagawane Death: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का? असा सवाल पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.

पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death) आत्महत्या प्रकरणानंतर राज्याच्या महिला आयोगावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का? असेही प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आला आहे. (Vaishnavi Hagawane Death)
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना महिला अत्याचाराच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा, असा टोला देखील पत्रातून लगावण्यात आला आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी पोस्टात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवलं आहे. (Vaishnavi Hagawane Death)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलांनी नेमकं पत्रात काय म्हटलंय?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलांनी पत्रात लिहलं आहे की, "आपल्या भारतीय संविधानात देशातील महिलांच्या हक्काचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदीनुसार राज्य सरकारने 1993 साली राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोगाची स्थापना केली. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे. महिलांना न्याय वागणूक मिळून देणे. महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन करणे असे बहुउद्देश त्यामागे होता. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, ताकद महिला आयोगाला देण्यात आली आहे".
....तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती
"सध्या राज्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण केंद्र स्थानी आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे आहे असे स्पष्ट दिसत आहे. आत्महत्या करण्याआधी सासरच्या मंडळींनी वैष्णवी यांचा प्रचंड छळ केला होता असे अनेक उदाहरणे आता समोर येत आहेत. हगवणे कुटुंबात फक्त वैष्णवी यांचाच छळ केला गेला नाही तर त्यांची मोठी सून मयुरी हगवणे यांचा देखील अशाच प्रकारे छळ करण्यात आला होता. मयुरी यांनी त्यावेळी महिला आयोगात धाव घेतली मात्र त्याबाबत काही ठोस पावले उचलली गेली नाहीत. आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का? असा आमचा प्रश्न आहे. जर महिला आयोगाने मयुरी यांच्याच प्रकरणात कठोर पावले उचलली असती तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती".
परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार
"महोदय, आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अन्यायकारक वागणूक वाढत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून हडपसर मध्येही एका महिलेने आत्महत्या केली आहे. दीपा प्रसाद पुजारी असं त्या महिलेचे नाव आहे. मध्यंतरी पुण्यात एका परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनु कुकडे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातही सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे नाव आले होते. हे प्रकरण ही प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. त्या विदेशी महिलेला न्याय मिळाला की नाही याबाबत काही थांगपत्ता नाही. सांगायचे तात्पर्य इतकेच की राज्यात विविध ठिकाणी असे प्रकार घडत आहेत पण महिला आयोग महिलांना न्याय देण्यात असमर्थ ठरत आहे".
महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये
"सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचाराच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये कारण त्याचा फरक थेट महिलांवरील प्रश्नांवर पडेल. त्यामुळे आमची मागणी आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी जेणेकरून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल.आमच्या मागणीचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल ही अपेक्षा", असं पत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहलं आहे.



















