(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPSC ला मल्टिपल डिसॅबिलीटीचं सर्टिफिकेट दिलं अन् बिनधास्त बास्केटबॉल खेळताना दिसले? आणखी एका आयएएस अधिकाऱ्यावर आरोप
Pune : पूजा खेडकरसारखे अनेक अधिकारी बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि युपीएससीला खोटी माहिती पुरवून अधिकारी झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर युपीएससीने त्यांचं पदही रद्द केलं. शिवाय तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
Pune : पूजा खेडकरसारखे अनेक अधिकारी बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि युपीएससीला खोटी माहिती पुरवून अधिकारी झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर युपीएससीने त्यांचं पदही रद्द केलं. शिवाय तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आणखी एका अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत.
आयएएस अधिकाऱ्याने देखील यूपीएससीला चुकीची माहिती पुरवून पद मिळवल्याचा आरोप
पुण्यात फर्ग्यूसन महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आणि काही वर्ष भारतीय सैन्य दलात काम केलेल्या आयएएस अधिकाऱ्याने देखील यूपीएससीला चुकीची माहिती पुरवून पद मिळवल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुभार यांनी केला आहे. कुंभार यांनी ट्विटकरुन हे आरोप केले आहेत. यासंदर्भातील अनेक पुरावेदेखील ट्विटसोबत जोडले आहेत. अमोल हे सध्या गुजरात केडरमध्ये कार्यरत आहे. त्यांनी यूपीएससीसाठी दाखवलेल्या कागदपत्रात विसंगती आढळून आल्याने हा प्रकार समोर आला.
विजय कुंभार यांनी ट्वीटरवरुन कोणते आरोप केले?
विजय कुंभार म्हणाले, अमोल आवटे हे सैन्यात कार्यरत असताना 2014 मध्ये कांगो येथे दुखापत झाली होती, मात्र त्यांनी आपली सेवा सुरूच ठेवली होती. 2021 पर्यंत, त्याच्या लक्षात आले की ते दुखापतीमुळे ते सैन्यात काम करु शकणार नाही. त्यानंतर त्यांनी 2021 मध्येच एमडी (मेडिकल डिसॅबिलीटी) श्रेणीअंतर्गत आयएएसमध्ये सामील झाले. 21 एप्रिलच्या त्यांच्या मेडिकल बोर्डाच्या जाहिरनाम्यात त्यांना कोणतीही दुखापत झालं नसल्याची माहिती दिली आणि यावरुन त्यांनी चुकीची माहिती युपीएसलीला दिल्याचा संशय आहे. दोन्ही जाहीरनाम्यात विसंगती आढळल्याने त्यांच्यावरील संशय आणखी बळावतोय.
Can a person who cannot jump or walk long distances play basketball? What is the authenticity of the medical certificate on which one gets allocated to #IAS? Can the salary or pension of a Lt. Colonel rank be 1-5 lakh per year? Isn’t it mandatory that all the info provided to… pic.twitter.com/5joTD2tGzC
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 31, 2024
आयएएसमध्ये रुजू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी जून 2024 मध्ये त्यांनी यूडीआयडी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला, ज्यात 2022 मध्ये एम्समध्ये अपघात आणि उपचारांचा उल्लेख होता. प्रत्यक्षात ही वैद्यकीय तपासणी होती, उपचार नव्हते. त्यामुळे २०१४ मध्ये झालेली दुखापत आणि ज्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने यूपीएससीची परीक्षा दिली आणि २०२१ मध्ये आयएएस कोटा मिळवला त्याचे काय झाले?, असा प्रश्न विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
2022 पासून एम्स रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले
21 एप्रिल 2020 मध्ये मेडिकल बोर्ड जाहीरनाम्यात त्यांनी आपल्याला यापूर्वी कोणतीच दुखापत झाली नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्याठिकाणी विसंगती निर्माण झाली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2024 मध्ये त्यांनी UDID प्रमाणपत्रासाठी अर्ज केला यावेळी आपण 2022 पासून एम्स रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. LBSNAA संस्थेत प्रवेश घेतल्यावर त्यांनी बास्केटबॉल, घोडस्वारी यांसारख्या शारीरिक कसरती आणि खेळांमध्ये सहभाग घेतला होता. याचा अर्थ 2022 मध्ये एकीकडे मेडिकल बोर्डाने त्यांना ५२% अपंगत्व असल्याचे जाहीर करत, ते कोणतेही शारीरिक हालचाल करू शकत नसल्याचे जाहीर केले, तर दुसरीकडे मात्र आवटे आपल्या आवडीचे खेळ मोठ्या आनंदाने खेळत असल्याचे दिसून येते, असंही कुंभार यांनी म्हटलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीनं पाहणं गरजेच; राज्य मागास प्रवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर